शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोहारेच्या सरपंचपदी मदन जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:39 IST

वाई : लोहारेच्या सरपंचपदी डॉ. मदन सर्जेराव जाधव यांची व उपसरपंचपदी अश्‍विनी सचिन सावंत यांची निवड झाली आहे. आमदार ...

वाई : लोहारेच्या सरपंचपदी डॉ. मदन सर्जेराव जाधव यांची व उपसरपंचपदी अश्‍विनी सचिन सावंत यांची निवड झाली आहे.

आमदार मकरंद पाटील यांचे समर्थक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने ग्रामपंचायतीत बाजी मारून राष्ट्रवादीचा किल्ला अबाधित राखला.

निवडीनंतर आयोजित बैठकीत सरपंच डॉ. मदन जाधव म्हणाले, ‘गावातील सर्व घटकांना एकत्र घेऊन विकासाच्या विविध योजना राबविणार आहे. आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा, महिला सबलीकरण यामध्ये विशेष काम करणार आहे.’

यावेळी नवनिर्वाचित सदस्य विठ्‌ठल भिलारे, मनीषा गुरव उपस्थित होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी नरेंद्र गायकवाड यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक सोनावणे यांनी सहकार्य केले.

नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बाळासाहेब भिलारे, विजय भिलोरे, जिजाबा भिलारे, तुषार भिलारे, महादेव भिलारे, राजेंद्र भिलारे, सुरेश भिलारे, विलास सावंत, रमेश सावंत, हणमंत सावंत, अमर सावंत, हणमंत बाबर, निवृत्ती भोसले, लक्ष्मण भोसले, सुनील भोसले, भिकू इथापे, जगन्नाथ गुरव, अमित शेलार, अभिषेक शेलार, प्रदीप शेलार, सिध्दार्थ शेलार, ज्ञानेश्वर संकपाळ, किरण पिसाळ, साहेबराव भोईटे उपस्थित होते.

चौकट :

‘भाजप’ची कडवी झुंज

तालुक्यातील राजकीय पटलावर महत्त्वाची असलेली लोहारे ग्रामपंचायत अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. यामध्ये भाजपचे दत्तात्रय ढेकाणे व वैभव सावंत यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने कडवी झुंज देऊन सातपैकी तीन जागांवर विजय मिळविला. यामध्ये भैरवनाथ पॅनेलच्या मंगल कोंडीराम सावंत, नंदा जयवंत शेलार, प्रशांत शंकर गुरव यांनी विजयश्री खेचून आणल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने ही कडवी झुंज दिली.

आयकार्ड

१५मदन जाधव

१५अश्विनी सावंत