शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एशियाड बसमध्ये आता ‘लक्झरी’ आसन व्यवस्था

By admin | Updated: May 16, 2016 00:56 IST

‘भंगार डब्बा’ कात टाकतोय : सातारा विभागाच्या ताफ्यात २७ गाड्या दाखल

जगदीश कोष्टी / सातारा ‘लाल डबा’, ‘भंगार डबडा’ ही ओळख पुसण्यासाठी एसटी महामंडळ नेहमीच प्रयत्नशील असते. खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करताना नवनवीन बदल स्वीकारत आहे. लक्झरी गाड्यांप्रमाणेच एसटीने एशियाडमधील आसन रचनेत बदल केला आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी सीटची मागे घेण्याची सुविधा बसमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे एशियाड बस आता खऱ्या अर्थाने आरामदायी झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या हिरकणी, परिवर्तन, साधी गाडी, मिनी बस तर काही भागांत मिडी बसही प्रवाशांची सेवा बजावत आहेत. मात्र, उचकटलेले पत्रे अन् गळक्या गाड्यांमुळे एसटीला हिणवले जात होते. महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था पाहिल्यानंतर गाड्या आणल्या तरी त्यांचा खुळखुळा होतो. पत्रे उचकटणे, खिडक्या अन् काचा ढिल्या होणे हा प्रकार घडत असतो. त्यामुळे गाड्यांची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होते आहे. सतत आवाज करत असल्याने लोकांना प्रवास करताना डोकेदुखी होत असते. त्यामुळे सुशिक्षित प्रवाशांमधून एसटीविषयी नाराजीचा सूर निघत होता. त्यामुळे प्रवासी खासगी वाहतुकीचा आधार घेत असतात. प्रवाशांना एसटीकडे खेचण्यासाठी राज्य परिवहन महामंडळानेही एसटी बसच्या रचनेत व सेवेत वेळोवेळी बदल करण्याची भूमिका घेतली आहे. एशियाड हिरकणी गाड्यांच्या आसनरचनेत बदल केला असून, प्रवास अधिक सुखकर होण्याच्या दृष्टीने गाडीतील आसने हवी त्याप्रमाणे पाठीमागे घेण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आरामदायी प्रवास होत आहे. नवीन बनावटीच्या गाड्या तीन महिन्यांपासून रस्त्यावर धावू लागल्या आहेत. नवीन बनावटीच्या २७ गाड्या सातारा विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आसन क्षमता दोनने कमी सीट मागे घेतल्यानंतर पाठीमागील प्रवाशांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी पुरेसे अंतर ठेवावे लागते. त्यामुळे एशियाड गाड्यांमधील आसन क्षमता कमी केली आहे. ही संख्या ३५ वरून ३३ वर आली आहे. साध्या गाडीच्या तुलनेत एशियाडमध्ये तिकिटात १५ ते २० रुपयांची वाढ होते. त्यामुळे नव्या नियमानुसार प्रवाशांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुखदायी होणे अपेक्षित आहे. गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतल्यास त्याचा बसलेलांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे नवीन रचनेमध्ये भलेही आसन क्षमता दोनने कमी झाली असली तरी एकाही प्रवाशाला उभे राहून प्रवास करू देऊ नये, असा नियम तयार केला आहे.