शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डे हवेलीत एक लाखाची कुस्ती बरोबरीत

By admin | Updated: May 19, 2016 00:16 IST

कुस्तीचे आयोजन शिवसंग्रामचे शिवाजीराव चव्हाण, कऱ्हाड उत्तरचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश चव्हाण यांनी केले

कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली येथे कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथम क्रमांकाची इनाम १ लाखाची कुस्ती बरोबरीत सुटली तर अनेक कुस्त्या निकाली झाल्या. अटीतटीच्या झालेल्या कुस्त्यांमुळे प्रेक्षकांच्या नजरेने पारणे फिटले. पैलवान विजय गुटाळ विरुद्ध पैलवान गोकूळ अवारे यांची कुस्ती बरोबरीत सुटली. पैलवान गुटाळ यांच्या पायाला दुखापत झाल्याने ही कुस्ती सोडवण्यात आली. दुसरी कुस्ती पैलवान विनोद शिंदे, कोल्हापूर याने अजय निकम, साखराळे याला पोकळ घिस्सा डावावर चितपट करून पे्रक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले, तर दुसऱ्या क्रमांकाच्या दुसऱ्या कुस्तीमध्ये नयन निकम, कोल्हापूर यांना विजयी घोषित करण्यात आले. पैलवान संग्राम पाटील आटकेकर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केल्याने प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. पैलवान तानाजी चव्हाण, साखराळे यांनी पैलवान गोरख जाधव, कोल्हापूर याला ढाक डावावर चितपट करून ते विजयी झाले. पैलवान सागर साळवे, पुणे याने हरी रुंदवे यांच्यावर मात करून निकाली कुस्ती केली. पैलवान गौरव हजारे, कऱ्हाड, इंद्रजित तणपुरे, कोणेगाव, पवन शिंदे, अंतवडी, रोहित चव्हाण, कोपर्डे, इंद्रजित पवार, वडोली निळेश्वर यांच्या कुस्त्या चटकदार झाल्या.पंच म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान नसरूद्दीन नायकवडी, धनाजी पाटील, जालिंदर चव्हाण, सुनील पोळ, बाबूराव चव्हाण, भास्कर चव्हाण यांनी काम पाहिले.कुस्तीचे आयोजन शिवसंग्रामचे शिवाजीराव चव्हाण, कऱ्हाड उत्तरचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश चव्हाण यांनी केले होते. (वार्ताहर) कोपर्डे हवेली येथे प्रथम क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडविताना रामकृष्ण वेताळ, संदीप मोझर, पैलवान धनाजी पाटील.