शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अनुुदान लाटूनही स्वच्छतागृह कागदावरच

By admin | Updated: February 28, 2017 23:41 IST

विरोधकांचा आरोप : फलटण पालिकेच्या सभेत खडाजंगी; बोगस लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्याची मागणी

फलटण : केंद्र गृहनिर्माण व शहरी गरिबी निर्मूलन प्रधानमंत्री आवास योजना राबविण्याकामी शासन निर्देशानुसार सर्वेक्षण करण्यासाठी एजन्सी नेमणे, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी १४ व्या वित्त आयोगातून नगरपालिकेची रक्कम देणे, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची दुरुस्ती करणे, भाजी मंडई वसुली ठेका पद्धतीने देणे आदी ४२ विषयांना नगरपालिका बैठकीत मंजुरी देण्यात आली. एका विषयाला विरोधकांनी विरोध केला. दरम्यान, शौचालयाच्या कामात व यादीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. फलटण नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगरपालिका सभागृहात नगराध्यक्षा नीता नेवसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.केंद्र गृहनिर्माण व शहरी गरिबी निर्मूलन प्रधानमंत्री आवास योजना राबविण्याकामी शासन निर्णयातील निर्देशानुसार सर्वेक्षण करण्याकामी एजन्सी नेमण्याचा विषय सर्वप्रथम घेण्यात आला. यामध्ये जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करून त्यावरील झोपड्यांचा आहे तेथेच पुर्नविकास करणे, कर्ज व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांनाही परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे. खासगी भागीदारीमध्ये परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकूल बांधण्यास अनुदान याचा समावेश आहे. यावर विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी शासनाच्या पूर्वीच्या घरकुलाच्या योजना का प्रभावीपणे राबविल्या गेल्या नाहीत. अनुदान का परत गेले याचा खुलासा मागितल्यावर उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी लाभार्थ्यांकडे योग्य जागा नसणे, पैसे नसणे तसेच सरकारकडून कमी अनुदान येणे असे प्रकार घडल्यामुळे योजना राबविताना अडचणी आल्या. मात्र, यापुढे प्रभावीपणे योजना सर्व संमतीने राबविण्याची ग्वाही दिली.स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी १४ व्या वित्त आयोगातून नगरपरिषदेची रक्कम देण्याच्या ठरावावर विरोधकांनी बराच गोंधळ घालून शौचालयाच्या कामात व यादीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. अनेकांनी नुसते पैसे नेले. शौचालये बांधली नाहीत. ज्याला गरज आहे, त्याला प्राधान्याने पैसे द्या. बोगस लाभार्थींचे पैसे वसूल करा, अशी मागणी विरोधकांनी केली. यावर सत्ताधारी गटाने बोगस लाभार्थी दाखवा कारवाई करतो, असे प्रत्युत्तर दिले. यावर बराच गोंधळ उडून हा विषय मंजूर करण्यात आला.फलटण शहरातील गजानन चौक येथे महात्मा गांधी यांचा पुतळा असून, या पुतळ्याची दुरवस्था झाल्याने या पुतळ्याची दुरुस्ती करण्यासाठी ४५ हजार रुपये खर्च करण्यास परवानगी देण्यात आली. मंजूर विकास योजना आरक्षण क्र. ३१ शासनस्तरावर रद्द करण्यात आले आहे. या आरक्षणाबाबत जागा संपादनाचा प्राप्त निधी फलटण कॉटन सेल जिनिंग अ‍ॅण्ड प्रोसिंग को. आॅपरेटिव्ह सोसायटी लि., फलटण यांची मिळकतीचे न. भ. क्र. ६४४४ या जागेतून ८० फुटी रिंगरोड रस्ता नगरपालिकेने विकसित केला आहे. या रस्त्याची नुकसान भरपाई या संस्थेने अदा करण्याच्या विषयावर विरोधकांनी अधिक माहिती मागितली. मात्र, ती त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना देता न आल्याने गोंधळ उडून हा विष्य पुढच्या मीटिंगला पुन्हा घेण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र, सत्ताधारी गटाने ती मान्य न करता हा ठराव मंजूर केला. यावर विरोधकांनी विरोध करत ठरावाला विरोध असल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)