शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

टीकाकारांना ‘कमळ’ अन् निष्ठावंताना ‘काटे’!

By admin | Updated: August 13, 2014 23:38 IST

भाजपचे धोरण : निवडून येण्याची शक्यता असलेल्या मातब्बरांनाच म्हणे तिकीट; जुने पदाधिकारी मात्र अस्वस्थ

सातारा : ज्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये राहून भारतीय जनता पक्षावर टीकेचा आसूड ओढला त्याच मंडळींसाठी भाजपच्या नेत्यांनी पायघड्या अंथरल्या आहेत. नव्याने पक्षात येणाऱ्यांना प्रमाणापेक्षा अधिकचे दिलेले महत्त्व भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना खटकत असल्यामुळे त्यांच्यातील अस्वस्थता वाढू लागली आहे. सातारा, कोरेगाव, माण आणि खटाव या तीन तालुक्यांत त्याची तीव्रता अधिक आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही भाजपमध्ये देण्यात आलेल्या प्रवेशामुळे आश्चर्याचा सूर उमटत आहे. भाजपची नेतेमंडळी पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हाती ‘कमळ’ देण्यास सरसावली असली तरी ज्यांनी आयुष्यभर भाजपचा प्रचार आणि प्रसार केला त्यांना मात्र बाजूलाच ठेवले जात आहे. परिणामी निष्ठावंतांचा हा गट अस्वस्थ झाला आहे. दिलीप येळगावकरांना विरोध असतानाही त्यांना प्रवेश दिल्याची चर्चाही तावडे यांच्या पत्रकार परिषदेत झाली. परिणामी त्यांनीही यावर कोणतेही भाष्य केले नाही.काँग्रेस-राष्ट्रवादी आणि अन्य काही नेते जिल्ह्यातील भाजपच्या कोणत्याही स्थानिक नेत्यांशी चर्चा न करता थेट प्रदेश पातळीवरील नेत्यांशी संपर्क साधून भाजपमध्ये घेण्याची विनंती करत आहेत. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होऊ लागले आहेत. भाजपला कोणत्याही परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि खास करून सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा झटका द्यायचा आहे. त्यासाठीची जबाबदारी ही विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यावर देण्यात आली आहे. परिणामी गेले काही दिवस ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य केले आहे.युतीच्या जागा वाटपाप्रमाणे भाजपकडे कऱ्हाड दक्षिण, माण आणि सातारा हे तीन मतदारसंघ होते. आता तर त्यांनी जिल्ह्यात या तीन मतदारसंघांबरोबरच कोरेगाव आणि फलटण या आणखी दोन मतदारसंघांची मागणी केली आहे. भाजपची ही मागणी राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेसाठी धक्कादायक आहे. त्याविषयी अजून कोणतीही प्रतिक्रिया उमटली नसली तरी आज ना उद्या त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.कोरेगाव आणि माण विधानसभा मतदारसंघांत भाजपची डोकेदुखी वाढली आहे. कोरेगाव शिवसेनेकडे असताना येथून भाजपकडून माजी आमदार कांताताई नलवडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी विनोद तावडे यांच्या उपस्थितीतच सातारा येथे उमेदवारीस नकार दिला असला तरी कार्यकर्ते त्यांच्यासाठी आग्रही आहेत. आता तर महेश शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारीसाठीच शड्डू ठोकला आहे. हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. सध्या तरी हा मतदारसंघ शिवसेना भाजपला सोडेल, अशी शक्यता नाही. त्यामुळे भाजपचा जुना गट अस्वस्थ आहे. कोरेगावातील काँग्रेसचा एक नेता आपल्या एका नातेवाइकाच्या मदतीने भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्यांना कोरेगावातून उमेदवारी हवी, अशी त्यांची मागणी आहे. (प्रतिनिधी)कोरेगावात शिवसेनेचे काय..?कोरेगाव विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडावा या मागणीमुळे शिवसेनेचाही एक गट अस्वस्थ झाला आहे. हणमंत चवरे, दिनेश बर्गे, दत्ताजी बर्गे, हरिदास जगदाळे, चंद्रकांत जाधव, प्रताप जाधव ही जुनी आणि निष्ठावंत मंडळी गेले अनेक दिवस दोन्ही काँग्रेसच्या विरोधात लढत असून, यापैकी अनेकांना आमदारकी लढवायची आहे. हणमंत चवरे, दिनेश बर्गे आणि दत्ताजी बर्गे यांनी तर शड्डूच ठोकला आहे. त्यातच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि राष्ट्रवादीचे महेश शिंदे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांनाच उमेदवार म्हणून पुढे केले जात आहे. ही बाब स्थानिक शिवसेना नेत्यांसाठी चुळबूळ वाढविणारी ठरली असल्याची चर्चा आहे.