शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

ठोसेघर येथे दाम्पत्यास जिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : तालुक्यातील ठोसेघर येथे एका दाम्पत्यास मारहाण करून त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : तालुक्यातील ठोसेघर येथे एका दाम्पत्यास मारहाण करून त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नऊजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पांडुरंग विठोबा जाधव, सुलाबाई पांडुरंग जाधव, संतोष पांडुरंग जाधव (सर्व रा. मायणी, ता. जावळी, सध्या रा. ठोसेघर), रमेश यशवंत बेडेकर, लीलाबाई गणपत पवार, तानाजी कोंडिबा चव्हाण, हरिबा दगडू चव्हाण, रामचंद्र मारुती जाधव, दिलीप भाऊ सुतार (सर्व रा. ठोसेघर) हे नऊजण अशोक जगन्नाथ काकडे (वय ६१, रा. ठोसेघर, ता. सातारा) यांच्या ठोसेघर येथील राहत्या घराशेजारी दि. १३ जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कम्पाऊंड करत होते. यावेळी अशोक काकडे आणि त्यांच्या पत्नीने या सर्वांना रस्ता सोडून कम्पाऊंड करा, असे सांगितले. याचा राग आल्याने या नऊजणांनी ''तुझा येथे काही संबंध नाही. आम्ही या जागेचे मालक असून, तुला येण्या-जाण्याची वाट सरकारला विचार,'' अशी दमदाटी करत जातिवाचक शिवीगाळ केली. यावेळी काकडे दाम्पत्याच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्कीही करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर ''जर पुन्हा कामात आडवा आला तर तुला येथेच गाडून टाकू,'' अशी धमकी दिली.

या घटनेनंतर काकडे यांनी या नऊजणांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर मारामारी केल्याचा तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल अधिक तपास करत आहेत.