शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बंद ट्यूबांचा पालिकेत ‘उजेड’

By admin | Updated: December 25, 2014 00:15 IST

जागा पुरेना : लिलावपद्धतीने होणार विक्री

सातारा : शहरातील विद्युत खांबावर बंद पडलेल्या ट्यूबांचा खच पालिकेच्या टेरेसवर पडला असून, या ट्यूबांचा लिलाव होणार आहे. मात्र ट्यूबांचा लिलाव घेऊन त्यातून कवडीमोल रक्कम पदरात पडणार असल्याने पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.शहरातील लाईटव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी पालिकेतर्फे ट्यूब लाईट, मर्क्युरी लॅम्प, हायमॅक्सचे दिवे याद्वारे शहराला प्रकाश देण्याचा प्रयत्न केला जातो. फार पूर्वीपासून रस्त्यावर ट्यूबलाईट लावल्या जात होत्या. मात्र, कालांतराने अशा ट्यूबलाईट नामशेष होत गेल्या. या ट्यूबलाईटची जागा अत्याधुनिक अशा हायमॅक्सच्या दिव्यांनी घेतली; परंतु शहरात अद्यापही काही ठिकाणी रस्त्यावरील विद्युत खांबावर ट्यूबलाईट आहेत. सगळीकडेच हायमक्सचे दिवे लावणे पालिकेला परवडणारे नसल्यामुळे नादुरुस्त झालेल्या ट्यूबा काढून त्या जागी नवीन ट्यूबा बसविल्या जात आहेत.शहरातील प्रमुख रस्ते व चौकात बसविलेल्या या ट्यूबलाईट काढून टाकण्यात आल्या आहेत. मुख्य रस्त्यांवर हायमॅक्स दिवे असले तरी शहरातील गल्ली बोळातच ट्यूबलाईट दिसत आहेत. विविध रस्त्यांवरील ट्यूबा काढल्यानंतर त्याची कागदोपत्री नोंद करण्यासाठी त्या ट्यूबा पालिकेतील विद्युुत विभागात जमा कराव्या लागतात.शहरातील निकामी व नादुरुस्त झालेल्या ट्यूबलाईटच्या नोंदी करण्यासाठी सर्व ट्यूबा पालिकेच्या टेरेसवर ठेवण्यात आल्या आहेत. या ट्यूबा बिनकामी असल्याने अनेक महिन्यांपासून टेरेसवर पडून आहेत. भंगारात याची कवडीमोल किंमत असल्यामुळे विद्युत विभाग या ट्यूबांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस टेरेसवर ट्यूबांचा खच वाढतच चालला आहे. (प्रतिनिधी) चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा... या ट्यूबा लिलावपद्धतीने भंगारात देण्यात येणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले; परंतु या ट्यूबा भंगारात विकल्यास काचेच्या दराप्रमाणे म्हणजेच किलोला पन्नास पैसे दराने विकल्या जातील. त्यामुळे कोणता व्यावसायिक हा लिलाव घेऊन फायदा कमविणार, याची वाट पाहाणे म्हणजेच, चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा... ,अशी अवस्था पालिका विद्युत विभागाची झाली आहे.