शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदात्यावरच ओढवला मृत्यू!

By admin | Updated: February 20, 2015 23:14 IST

अजनूजजवळ अपघात : जीपच्या धडकेत खंडाळ्याच्या रेस्क्यू टीम जवानाचा मृत्यू

शिरवळ/खंडाळा : पुणे-बंगळूर महामार्गावर कुठेही अपघात झाला तर ‘तो’ धावून येत असे. या जीवनदात्या ‘तेजस’ वरच काळाने असा घाला घातला. खंडाळा रेस्क्यू टीमचा सभासद असणारा तेजस दत्तात्रय ढमाळ (वय २३) याचा अपघातात झालेला मृत्यू अनेकांना धक्का देऊन गेला आहे. खंडाळा ते असवली रस्त्यावर अजनूज गावच्या हद्दीतील ओढ्याजवळून तेजस त्याच्या दुचाकीवरून निघाला होता. जीपने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरून तो खाली आदळला. या अपघाताच त्याचा मृत्यू झाला. याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असवली, ता. खंडाळा येथील तेजस दत्तात्रय ढमाळ (वय २३) हा गुरुवारी (दि. १९) नऊ वाजण्याच्या सुमारास खंडाळाहून असवलीकडे जात असताना अजनूज गावाजवळील ओढ्याजवळ समोरून येणाऱ्या जीपने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात तेजस गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्यास उपचारासाठी शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तेजस ढमाळ हा तरुण खंडाळा पोलिसांनी नव्याने बनविलेल्या खंबाटकी अपघात मदत पथकातही सदस्य झाला होता. अनेक अपघातांमध्ये तो अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जात असे. या अपघाताची खबर प्रवीण धर्मराज ढमाळ यांनी खंडाळा पोलिसांत दिली असून, याबाबत अधिक तपास सहायक फौजदार जाधव करीत आहेत.दरम्यान, खंडाळा परिसरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असली की विवंचनेत पडलेल्या लोकांसाठी धावून जाण्यात तेजस आपले कर्तव्य मानायचा. असवलीतील दत्तात्रय ढमाळ यांचा तो एकुलता एक मुलगा. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही दुसऱ्यासाठी धडपडण्यात तत्पर असायचा. त्याच्या अशा प्रकारे जाण्याने सर्वचजण दु:खात आहेत. (प्रतिनिधी)वाढदिवसाच्या तिसऱ्याच दिवशी मृत्यूशी गाठतेजसेचा बुधवार, दि. १८ रोजी २२ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या तिसऱ्याच दिवशी त्याला मृत्यूने गाठल्याचा दुर्दैवी योगायोग घडला आहे. विशेष म्हणजे, अपघातानंतर तेजसला वैद्यकीय मदत मिळाली तिही तुटपुंजी. यामध्ये गंभीर झालेल्या तेजसचा मृत्यू झाला. तेजसचे वडील ट्रान्सपोर्टमध्ये चालक आहेत. ते कामानिमित्त ते चेन्नई येथे गेले होते. खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व ग्रामस्थांनी या अपघाताची माहिती तेजसचे वडील काम करत असलेल्या ट्रान्सपोर्ट मालकाला दिल्यानंतर त्याने त्यांच्यासाठी माणुसकी दाखवित विमानाची सोय केली.