शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करणाऱ्या डॉक्टरला जन्मठेप

By admin | Updated: May 17, 2016 01:47 IST

कऱ्हाड न्यायालयाचा निकाल : कौटुंबिक वादातून आवळला होता गळा

कऱ्हाड : कौटुंबिक वादातून गर्भवती पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या डॉक्टरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. एम. आर. देशपांडे यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली. डॉ. महेश शामराव पवार (वय ३८, मूळ रा. पाल, ता. कऱ्हाड, सध्या रा. तारळे, ता. पाटण) असे आरोपीचे नाव आहे. पाल येथील डॉ. महेश पवार याचा दि. ३ जून २००५ रोजी कुमठे येथील राजश्री यांच्याशी विवाह झाला. राजश्री यासुद्धा डॉक्टर होत्या. विवाहानंतर पाटण तालुक्यातील तारळे येथे डॉ. महेश व डॉ. राजश्री यांनी स्वतंत्र दोन रुग्णालये सुरू केली. त्यावेळी हे दाम्पत्य त्याचठिकाणी राहण्यास होते. कालांतराने राजश्री यांनी एका मुलीस जन्म दिला. त्या मुलीचे नाव सई ठेवण्यात आले. २००७ मध्ये राजश्री या पुन्हा गर्भवती राहिल्या. दरम्यानच्या कालावधीत राजश्री व महेश यांच्यात कौटुंबिक वाद होत होता. अशातच दि. २० नोव्हेंबर २००७ रोजी पहाटे पाचच्या सुमारास डॉ. राजश्री यांना कऱ्हाडातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्या बेशुद्ध होत्या. बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्या जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच डॉ. राजश्री यांचा मृत्यू झाला. डॉ. राजश्री यांचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदनानंतर स्पष्ट झाले. त्याबाबत मृत राजश्री यांचे वडील अर्जुन सावंत (रा. कुमठे, ता. कोरेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उंब्रज पोलिस ठाण्यात पवार याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पी. के. पाटील यांनी याचा तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र शहा यांनी काम पाहिले. त्यांनी १२ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्या. एम. आर. देशपांडे यांनी डॉ. महेश पवारला जन्मठेप, तीन हजार रुपये दंड व दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.डॉक्टरचा बनाव अखेर उघडडॉ. राजश्री या पाय घसरून पडल्याचे सांगण्यात आले होते. तसेच त्यावेळी ‘मी घरी नव्हतो, कऱ्हाडात होतो,’ असा बनावही पती डॉ. महेश पवारने केला होता. मात्र, त्याचा हा बनाव अखेर उघड झाला. राजश्री यांच्या शरीरावर कसल्याही जखमा नसल्याचे व त्यांच्या डोक्यालाही इजा झाली नसल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले.