शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरेगावच्या पुलांचे आयुर्मान संपले..

By admin | Updated: August 4, 2016 01:29 IST

शिरवळमध्ये वाहतुकीस धोका : बांधकाम कमकुवत, रस्ता खचला; कठडेही तुटले

साहिल शहा -- कोरेगावसातारा आणि सोलापूर जिल्ह्यांला जोडणारा सातारा-पंढरपूर राज्यमार्ग असून, त्याची नव्याने महामार्ग म्हणून दर्जोन्नती झालेली आहे. या मार्गावर कोरेगाव तालुक्यात दोन ब्रिटिशकालीन पूल असून, त्याची सध्याची अवस्था चांगली असली तरी, त्यांचे आयुर्मान संपलेले आहे. या ठिकाणी नवीन पर्यायी पूल उभारणे गरजेचे आहे. सातारा बाजूने कोरेगाव तालुक्यात प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्रिपुटी गावातील ब्रिटिशकालीन पूल लागतो. दोन्ही बाजूला तीव्र उतार असून, मधोमध हा पूल आहे. या पुलाच्या परिसरात झाडांचे साम्राज्य असून, पुलाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. पावसाळ्यात पुलाच्या परिसरात दाट हिरवी झाडी आणखीच वाढते. पुलाची खालून सविस्तर व सखोल पाहणी केल्यावर त्याची अवस्था धोकादायक असल्याचे लक्षात येते. आजवर या पुलावरून पुराचे पाणी वाहिले नसले तरी कोरेगाव आणि सातारा तालुक्यांला जोडणाऱ्याव अहोरात्र अवजड वाहतूक असलेल्या मार्गावर तो असल्याने त्याची डागडुजी होणे आवश्यक आहे.पुलावरून वाहन गेले की बसतो हादराशिरवळमध्ये वाहतुकीस धोका : बांधकाम कमकुवत, रस्ता खचला; कठडेही तुटलेमुराद पटेल ल्ल शिरवळ पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाजवळील भाग खचला गेला असून, पुलाचे कठडेही धोकादायक बनले आहेत. यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याठिकाणी कोणत्याही प्रकारचा धोका असल्याचा साधा बोर्डही लावण्याचे स्वारस्य संबंधित विभागांकडून दाखविण्यात आलेले नाही.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा-पुणे जिल्ह्याला जोडणारा जुना ब्रिटिशकालीन पूल आहे. या पुलाच्या दुरुस्तीबाबत ब्रिटिशांकडून राष्ट्रीय प्राधिकरण विभागाला पत्र आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ब्रिटिशांकडून कोणतेही पत्र आले नसल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.शिरवळनजीक महामार्गावर असलेल्या जुन्या पुलाजवळील मातीचा भाग खचून मोठ्या भेगा पडल्याचे दिसून येत आहे. भूकंप पचवून केरा पूल उभा अरुण पवार ल्ल पाटण पाटण : शहरात प्रवेश करतानाच ब्रिटिशांनी बांधलेल्या केरा नदीवरील पुलावरून गेल्याशिवाय पर्याय उरत नाही. गुहागर, पंढरपूर, जत या राष्ट्रीय मार्गावरील केरा पुलाला विशेष महत्त्व आहे. गेल्या १३ वर्षांपूर्वी या केरा पुलाची लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली आहे.पाटण शहरानजीक ब्रिटिशकालीन केरा पूल अंदाजे ५० मीटर उंचीचा आहे. याच पुलावरून कऱ्हाड, पाटण ते कोकणाकडे जाणारी वाहतूक अहोरात्र सुरू असते. कोयना धरणातून पाणी सोडल्यानंतर केरा नदीचा प्रवाह कोयनेच्या पाण्याच्या प्रचंड दाबामुळे रोखला जातो. त्यामुळे केरा पुलाजवळ प्रचंड पाणी साचते. केरा पुलाच्या दगडी खांबावर वाढलेली झुडपे व झाडे पुलाचे बांधकाम निकामी करण्यास कारणीभूत ठरतात. तारळी पुलाचे दगड ढिलेअजय जाधव ल्ल उंब्रजपुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उत्तर मांड व तारळी या दोन नद्यांवर पूल आहेत. महामार्ग चौपदरीकरणात या नद्यांवर नवीन पूल झाले; पण ते वनवे आहेत. कऱ्हाडकडून साताराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी ब्रिटिशकालीन पुलाचा वापर केला जात आहे.तारळी नदीचे पात्र उंब्रजजवळ मोठे आहे. यामुळे या नदीवरील दगडी पूल मोठा आहे. ज्या-ज्या ठिकाणी जोडणी आहेत, तेथे झाडेझुडपे उगवली आहेत. याची मुळे दगडात पसरत असल्यामुळे बांधकामातील दगड ढिले झाले असण्याची शक्यता आहे. तसेच या दगडी पुलाच्या बाजूकडेच प्रथम तारळी नदीचा वेगवान प्रवाह धडकत असतो. यामुळे पाण्याचा दाब या पुलावरच पडतो.महामार्ग चौपदरीकरणानंतर या महामार्गाची देखरेख रस्ते विकास महामंडळाकडे आहे. पंरतु संबंधितांकडून या पुलाची पाहणी होती की नाही? हे समजू शकले नाही.उत्तर मांड नदीचे पात्र लहान आहे. या ठिकाणी ही कऱ्हाड बाजूकडून साताऱ्याकडे जाणारा पूल ब्रिटिशकालीन आहे. या नदीचे पात्र अरुंद आहे; पण प्रवाह वेगवान असतो. या नदीचा प्रवाह ही थेट पुलाला धडकत असतो.वाळू उपशामुळे नीरा पूलही धोक्यात..नसीर शिकलगार ल्ल फलटण सावित्री नदीवरील पूल वाहून जाण्यामागचे कारण नदीपात्रातील बेसुमार वाळू उपशामुळे पूल खचल्याचे बोलले जात असताना फलटण-बारामती रस्त्यावरील सांगवी येथील नीरा नदीवरील पूलही वाळू उपशामुळे व पुलाच्या दुरवस्थेमुळे वाहून जाण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. महसूल व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे पुलाची अत्यंत दयनीय अवस्था होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. फलटण-बारामती रस्त्यावर सांगवी (ता. फलटण) येथे नीरा नदीवर मोठा पूल आहे. १९५७ सालचा खूप जुना हा पूल असून, या पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. बाजूचे कठडे तुटले असून, पुलाखाली नदीपात्रात व लगत मोठमोठे खड्डे वाळू सम्राटांच्या बेसुमार वाळू उपशामुळे पडले आहेत. या पुलाच्या दुरुस्तीबाबत वारंवार विविध वृत्तपत्रे व जनतेने आवा उठवूनही महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिम्म कारभारामुळे दुर्लक्षच झाले आहे. फलटण व बारामती तालुक्याला जोडणाऱ्या या पुलावरून रोज हजारो वाहनांची व माणसांची ये-जा सुरू असते. पूल जीर्ण झाल्याने त्याच्या शेजारी नवीन पूल बांधण्याचे काम चौपदरीकरणाच्या रस्त्यात घेण्यात आले. मात्र ते काम अर्धवट राहिले आहे. नदीवरील या पुलावरून एखादे अवजड वाहन गेल्यास पूल थरथरतो.या पुलाच्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, शिरवळ-फलटण-बारामती रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात हा रस्ता पुणे बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केल्याने याविषयी माहिती देऊ शकत नाही. मात्र, पुलाची दुरवस्था झाल्याचे त्यांनी मान्य केले.