मसूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून नरेंद्र मोदींना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभरातून एक कोटी पत्रे पाठविण्यात येणार आहेत, याची घोषणा युवक प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख यांनी केली.
या मोहिमेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या नेतृत्वात आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेची सुरुवात पत्र लिहून वाघेश्वर (मसूर) येथील युवकांनी टपाल पेटीत पाठवली. या वेळी सूरज जाधव, महेश चव्हाण, नितीन जाधव, संकेत पवार, प्रज्ञाशील गाडे, किरण क्षीरसागर, आकाश जाधव, विशाल जाधव तसेच युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
१४मसूर पत्र
वाघेश्वर (मसूर), ता. कऱ्हाड येथील युवकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेली पत्रे.