शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात दिग्गज नेते

By admin | Updated: July 18, 2014 23:34 IST

प्रदेशाध्यक्ष तटकरे पहिल्यांदाच जिल्ह्यात : पक्षाची ताकद दाखविण्यावर कार्यकर्त्यांचा भर

सातारा : सातारा, माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला मिळालेले यश आणि येळगावकरांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा यामुळे राष्ट्रवादीत एकप्रकारची मरगळ आली आहे. त्यातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जेथे राष्ट्रवादी भक्कम तेथे काँगे्रसला दिलेला भक्कम ‘हात’ यामुळे राष्ट्रवादीत चलबिचल कायम आहे. परिणामी मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बालेकिल्ला सक्षमीकरणासाठी कोणता ‘निर्धार’ करणार याकडे जिल्ह्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत. आगामी महाराष्ट्र विधासनभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शनिवार, दि. १९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘मिशन २0१४-निर्धार मेळावा’ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पहिल्यांदाच जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत ‘निर्धार मेळावा’ होणार असल्यामुळे काँग्रेसजनांच्याही त्याकडे नजरा लागून राहिल्या आहेत. कोरेगावमध्ये मंत्री शशिकांत शिंदे आणि माजी खा. लक्ष्मणराव पाटील यांच्यातील संघर्षही अनेकदा उफाळून येतो. त्यातच आगामी निवडणुकीत लक्ष्मणराव पाटील यांनी सातारा तालुक्यातून मदत करावी, अशी अपेक्षा माजी आ. शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केल्यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे. पुणे विभागीय पदवीधर मतदार संघात राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे सुपूत्र सारंग पाटील यांचा पराभव पक्षातील काही नेत्यांसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आ. नरेंद्र पाटील आणि आ. पाटणकरांच्यातही फारसे सख्य नाही. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असणारी अंतर्गत धुसफूस राष्ट्रवादीसाठी अडचणीची असल्याचे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. त्याकडेही तटकरे यांना गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदी सातारचेच सुपूत्र असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांची निवड झाली आणि काँग्रेसला उभारी मिळू लागली. नेमका याचाच फायदा घेत काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून खास बाब म्हणून अनेक विकासकामांना प्राधान्य दिले आणि राष्ट्रवादीत चलबिचल सुरू झाली. त्यातच मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रत्येक दौऱ्यात साताऱ्यासाठी नवीन घोषणा केल्यामुळे आणि खास करून काँग्रेस बळकटीकरणावर लक्ष दिल्यामुळे राष्ट्रवादीपुढील आव्हाने आणखी वाढतच चालली आहेत. जेथे राष्ट्रवादी भक्कम तेथे मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष दिले आहे. परिणामी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांपुढे अनेक संकटे उभी राहिली आहेत. (प्रतिनिधी) जिल्हाध्यक्ष कोण होणार..? राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्तच असून त्याचा तात्पुरता कार्यभार कार्याध्यक्ष सुनील माने यांच्याकडे दिला आहे. पंधरा दिवस होण्यास आलेतरी जिल्हाध्यक्षपदी कोण, यावर अजूनही चर्चा झालेली नाही. त्यामुळे निर्धार मेळाव्यात या अनुषंगाने तटकरे कोणती घोषणा करणार की निर्णय प्रलंबित ठेवणार, याकडेही अनेकांच्या नजरा आहेत. लोकसभा निवडणुकीत फलटण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांना मताधिक्क्य मिळालेले नाही. ही बाब राष्ट्रवादीने आणि दस्तुरखुद्द रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही दुर्लक्षिलेली नाही. माणमध्ये राष्ट्रवादीअंतर्गतच बंडखोरीचे मोठे पीक आहे. जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी तर शड्डूच ठोकला आहे. सदाशिवराव पोळ यांनीही ‘किंगमेकर’ न होता स्वत:च ‘किंग’ होण्याचा मानस व्यक्त केला आहे. बाबा- दादा कऱ्हाडात; पण कार्यक्रम स्वतंत्र ! कऱ्हाड : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) व उपमुख्यमंत्री अजित पवार (दादा) शनिवार, दि़ १९ रोजी कऱ्हाड दौऱ्यावर आहेत़ यावेळी कऱ्हाड-पाटण तालुक्यांत विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन होणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे स्वतंत्र कार्यक्रम होणार आहेत़ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता तांबवे, ता़ कऱ्हाड येथील नवीन पुलाचे भूमिपूजन होणार आहे़ त्यानंतर एका सभागृहात होणाऱ्या मेळाव्याला पालकमंत्री शशिकांत शिंदे, विक्रमसिंह पाटणकर आदींची उपस्थिती राहणार आहे़ त्यानंतर कोयनानगर येथील संगमनगर धक्का पुलाचे भूमिपूजनही अजित पवारांच्याच हस्ते होणार आहे़ दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सकाळी १० वाजता कऱ्हाडला पोहोचणार आहेत. दुपारी १ वाजता सैदापूर, विद्यानगर, चौंडेश्वरीनगर, गोवारे, गजानन हौसिंग सोसायटी परिसरातील नागरिकांशी अभिजित कदम क्रीडा संकुलात होणाऱ्या कार्यक्रमात थेट संवाद साधणार आहेत. सकाळी ११ वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील नूतन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे़ तर दुपारी पोलीस गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे़ रविवारीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन ते मुंबईकडे रवाना होणार आहेत़ मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री बऱ्याच दिवसांनंतर कऱ्हाडला एकाच दिवशी येत असल्याने या दौऱ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे़ पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून अजित पवारांनी त्यांना होमपिचवर नेहमीच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय. आमदार बाळासाहेब पाटील यांना