शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांतीमुळे हलवा दागिन्यांची मोठी उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:32 IST

मकर संक्रांतीनिमित्त हलव्याचे दागिनेही बाजारात उपलब्ध झाले आहेत. यामध्ये महिलांचा सेट, लहान मुलांचा कृष्णा सेट, तसेच हलव्याचे इतर दागिने ...

मकर संक्रांतीनिमित्त हलव्याचे दागिनेही बाजारात उपलब्ध झाले आहेत. यामध्ये महिलांचा सेट, लहान मुलांचा कृष्णा सेट, तसेच हलव्याचे इतर दागिने बाजारात आले आहेत. यामध्ये चिमुरड्यांसाठी हे दागिने मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आले. (छाया : जावेद खान)

०००

बाजारपेठ फुलली

सातारा : मकर संक्रांतीनिमित्त साताऱ्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर सजली होती. गेल्या चार दिवसांपासून बाजारपेठ सातारकरांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. यामध्ये खणआळी, मोतीचौकात विविध वस्तू खरेदीसाठी गर्दी होत होती.

०००००००

साताऱ्यातून थंडी गायब

सातारा : साताऱ्यासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर थंडीची लाट गेल्या महिन्यात आली होती; पण आता परिसरातून थंडी गायब झाली आहे. त्यामुळे सातारकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. साहजिकच सकाळी व रात्री उशिरापर्यंत साताऱ्यातील रस्ते गजबजलेले दिसत आहेत. त्यामुळे मोतीचौकातील आइस्क्रीमच्या गाड्यांवर गर्दी होत आहे.

०००००००

तीळगुळाचे दर वाढले

सातारा : कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसायांवर परिणाम झाला आहे. त्याचा फटका अनेक लहान-मोठ्या उद्योगांना बसत आहे. मकर संक्रांतीला तीळगुळाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र, यंदा दरवर्षीपेक्षा रेवड्या, तिळाच्या वड्यांचे दर वाढल्याचे अनुभवास येत आहे. तरीही सातारकरांनी खरेदी केल्या.

०००००

रस्त्याची दुरवस्था

खटाव : खटाव तालुक्यातील प्रमुख रस्ते चकाचक दिसत असले तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जाखणगाव रस्ता अरुंद असल्याने समोरून एखादे वाहन आल्यास गाड्या चालविणे अवघड जात आहे. वाहनाला जाण्यासाठी रस्ताही मिळत नाही.

००००००

वाहनचालकांना त्रास

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांची यात्राही साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. पुसेगावमध्ये येणारी वाहतूक रात्री उशिरापर्यंत बंद केली होती. वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.

००००००

तरुणांमध्ये व्यसनाच्या प्रमाणात वाढ

सातारा : सातारा शहरातील तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. घर परिसरात मद्यपान, धूम्रपान करता येत नाही. ओळखीचे काही लोक पाहतील म्हणून हे तरुण दुपारी व रात्री उशिरापर्यंत उपनगरातील रिकाम्या जागी, रिकाम्या मंदिरांत जमत आहेत. त्याठिकाणी धूम्रपान, मद्यपान करत असतात. अशावेळी गोंधळही होत असतो.

००००००

व्यापाऱ्यांमुळे गर्दी

सातारा : साताऱ्यातील राजवाडा ते मंगळवार तळे मार्गावर भोगीच्या आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर व्यापारी व शेतकरी कृषी माल विक्रीसाठी घेऊन आले होते. ते रस्त्यावर बसलेले असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. वाहनचालकांना त्यातून मार्ग काढणेही अवघड झाले होते.