शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

हिल मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ ललिताच्या हस्ते !

By admin | Updated: September 7, 2016 23:53 IST

संयोजकांची माहिती : इथोपिया, केनिया, फिनलँड, जर्मनीसह देशभरातून सात हजार स्पर्धक

सातारा : गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या आंतरराष्ट्रीय ‘सातारा हिल मॅरेथॉन’ स्पर्धेत इथोपिया, केनिया, फिनलँड, जर्मन अशा अनेक देशभरातून १०० हून अधिक स्पर्धक धावणार आहेत. दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता रिओ आॅलिम्पिक धावपटू ललिता बाबर हिच्या हस्ते ‘फ्लॅग आॅफ’ करून स्पर्धेचा शुभारंभ पोलिस परेड मैदानापासून होणार आहे, अशी माहिती मॅरेथॉन असोसिएशन संयोजकांच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, स्पर्धकांची सत्वपरीक्षा ठरणाऱ्या यवतेश्वर सारख्या खडतर घाटातून हिल मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने धावण्याचे रेकॉर्ड ‘गिनीज वर्ल्ड’मध्ये सातारा हिल मॅरेथॉनने नोंदविले होते. यावर्षी ते रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न ‘सातारा हिल मॅरेथॉन’ करणार असल्याचेही असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले. पीएनबी मेटलाईफ ‘सातारा हिल मॅरेथॉन’चे हे पाचवे वर्ष आहे. यावर्षी स्पर्धेत देश-विदेशातील स्पर्धकांनी मोठा सहभाग नोंदविला आहे.गतवर्षी सर्व गटांतून ६५०० स्पर्धक धावले होते. त्यापैकी २६१८ धावपटू हे २१ किलोमीटरसाठी धावल्यामुळे या स्पर्धेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. सातारा हिल मॅरेथॉनने यावर्षी फक्त २१ किलोमीटरचीच मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी इथोपिया, केनिया, फिनलँड, जर्मनीसह देशभरातून ७ हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. गतवर्षी सातारा जिल्ह्यातील ८०० स्पर्धक सहभागी झाले होते. यावर्षी मात्र, हा प्रतिसाद वाढला आहे. २१ किलोमीटरसाठी १६०० स्पर्धक धावणार आहेत. यामध्ये महिला स्पर्धकांचीही मोठी वाढ झाली आहे. सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग पोलिस परेड मैदानापासून सुरू होतो. (प्रतिनिधी)‘बेटी कोई बोज नही’ चा दिला जाणार संदेश !देशातील मुलींची घटती संख्या हे देशापुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासन पातळीवर जनजागृती सुरू आहे. त्यामध्ये मॅरेथॉन असोसिएशन साताराही कुठे मागे नाही हे पदाधिकारी दाखवून देणार आहेत. स्त्री भू्रणहत्या रोखण्यासाठी ‘सातारा हिल मॅरेथॉन’मध्ये यावर्षी एक वेगळे वैशिष्ट्य पाहावयास मिळणार आहे. ३००० स्पर्धक सहकुटुंब लहान मुलींना खांद्यावर घेऊन धमाल फन रनमध्ये साडेतीन किलोमिटर अंतर धावून देशभर ‘बेटी कोई बोज नाही’ हा संदेश देणार आहेत.