शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुरांनाही धास्ती लोकरी माव्याची !

By admin | Updated: September 1, 2015 20:28 IST

शेतकरी हबतल : शरीरावर विपरीत परिणाम होण्याची भीती; मणदुरे विभागात भांगलणीची कामे रखडली

मणदूरे : पाटण तालुक्याच्या मणदुरे विभागातील शेतकरी अगोदरच संकटात सापडले आहेत. असे असताना या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढवले आहे. ऊसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हतबल झाले असून माव्याच्या भितीमुळे शेतमजुर कामाला येत नसल्याची परिस्थिती आहे. लोकरी माव्यामुळे ऊसाच्या पानावर काळा थर जमा होतो. तसेच सरीतही काळे थर जमा होत आहेत. त्यामुळे या लोकरी माव्याचा शरीरावर परिणाम होण्याच्या भितीने मजुर भांगलणीच्या कामालाच येईनासे झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नविन संकट उभे राहिले आहे. पाटण तालुक्याच्या मणदूरे विभागात चिटेघर लघु पाटबंधारे प्रकल्पामुळे केरा नदीकाठावर गेल्या चार वर्षापासुन बागायती शेती केली जात आहे. ऊसाच्या शेतीबरोबर अन्य भाजीपाल्याचे उत्पादनही या विभागात घेतले जाते. प्रामुख्याने ऊस शेतीवरच येथील शेतकरी भर देतात. गत हंगामामध्ये ऊसतोडी लांबल्यामुळे अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. साखरेचे दर उतरल्यामुळे ऊसाच्या दराची कोंडी झाली आहे. यातच भर म्हणून रासायनिक खते, औषधे, मजुरी, ऊस फोडणी, करण्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. यावर्षी साखरी, मेंढोशी, बिबी, देवघर, तामकणे, केर परिसरासह मणदूरे शिवारातील ऊसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे. अ‍ॅपिडोव्होरा नावाची किड उष्ण व दमट हवामान, तुरळक पडणारा पाऊस यामुळे वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. लोकरी मावा ऊसाच्या पानातील हरीतद्रव्य शोषून घेत असल्यामुळे प्रकाश संश्लेषण मंदावते. त्यामुळे ऊसाचे पन्नास टक्के उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)वन्यप्राण्यांचाही त्रासविभागात वन्यप्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर असतो. रानडुक्कर व गव्यापासुन शेतीचे मोठे नुकसान होते. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करून राखणदारी करावी लागत आहे.ऊसदर कमी झाल्यामुळे ऊसशेती परवडत नाही. रानडुकरांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. रासायनिक खते व मजुरीचे दर वाढले आहेत. त्यातच लोकरी माव्याची भर पडल्याने आम्ही हतबल झालो आहोत.- श्रीपती जाधव, शेतकरी, मेंढोशीलोकरी मावा किड नियंत्रणात आणण्यासाठी थायमेट व युरीयाचे मिश्रण सरीमध्ये टाकावे. त्यासोबत डायामिथेनेट १० लिटर पाण्यात २५ मिली याप्रमाणे मिसळून त्याची फवारणी करावी. या किडीचा शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे मजुरांनी भिती बाळगू नये.- एस. एस. चव्हाण, कृषी सहाय्यक, पाटण