शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरण अर्धे भरले

By admin | Updated: July 27, 2014 23:06 IST

पावसाचा जोर वाढला : तारळी धरणातून विसर्ग सुरू

सातारा / कोयनानगर : जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर ओसरला असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात मात्र संततधार कायम आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळी पावसाचा जोर मंदावला होता; मात्र दुपारनंतर जोर वाढल्यामुळे धरणांत पाणीसाठाही वाढत आहे. धरणात रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५१.६४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. दरम्यान, तारळी नदीवर असलेल्या तारळी धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असल्यामुळे पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणातून २३५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सातारा जिल्ह्यात आणि खास करून पश्चिम भागात गेल्या दहा दिवसांपासून जोरदार सरी कोसळत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मात्र, पावसाचा जोर मंदावला असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात मात्र संततधार कायम आहे. कण्हेर आणि उरमोडी पाणलोट क्षेत्रातही संततधार कायम असल्यामुळे या धरणांमध्येही पाणीसाठा वेगाने वाढत आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कण्हेर धरणात सात टीएमसी तर उरमोडी धरणात ८.०७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी असून, रविवारी सांयकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा ५१.६४ टीएमसी इतका झाला होता. कोयना धरणातील येवा २५,१९२ क्युसेक इतका असून पाणीपातळी २१०९.१ फूट इतकी आहे. कोयनानगर येथे गेल्या चोवीस तासांत ५४, नवजा येथे ६४ तर महाबळेश्वर येथे ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान, सातारा शहर आणि आजूबाजूच्या परिसरात रविवारी दिवसभर उन पावसाचा खेळ सुरू होता. हवेत गारवा असल्यामुळे रविवारी सातारकर बाहेर पडले नव्हते. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ९७.४ मिमी पावसाची नोंद झाली असून, तालुकानिहाय सरासरी ८.९ मिमी इतकी आहे.जिल्ह्यात आजअखेर झालेला पाऊस ५१९८.५ मिमी इतका असून, तालुकानिहाय सरासरी ४९४.५ मिमी इतकी आहे. (प्रतिनिधी)