शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव तालुक्यात ८१.९२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:43 IST

कोरेगाव : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी शांततेत सुमारे ८१.९२ टक्के मतदान झाले. दुरंगी लढत होत असल्याने प्रत्येक गावात आणि ...

कोरेगाव : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी शांततेत सुमारे ८१.९२ टक्के मतदान झाले. दुरंगी लढत होत असल्याने प्रत्येक गावात आणि वाडीवस्तीवर मोठी चुरस होती. ६८७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सोमवारी दि. १८ रोजी सकाळी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा नि:श्‍वास टाकला. ५६ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी नागेवाडी, चिलेवाडी, तडवळे संमत वाघोली, कोलवडी, होलेवाडी, भिवडी व बोधेवाडी (चिमणगाव) या ७ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. १२ ग्रामपंचायतींची अंशत: निवडणूक बिनविरोध झाली होती. ४९ गावांमध्ये ३४४ जागांसाठी ६८७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.

सकाळी मतदानाचा वेग नव्हता. अकराच्या दरम्यान मतदानाची आकडेवारी वाढत गेली. प्रत्येक वाडीवस्ती आणि गावात दुरंगी लढत होत असल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या अधिपत्याखाली प्रशासकीय यंत्रणेने अत्यंत काटेकोरपणे नियोजन केले होते. दिवसभर मतदान प्रक्रियेवर सूक्ष्म लक्ष ठेवण्यात आले होते. सायंंकाळी मतदानाचा आकडा चांगलाच वाढला होता.