शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डे हवेलीत जनावरांना लाळीची साथ

By admin | Updated: December 7, 2015 00:28 IST

शेतकरी हवालदिल : पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लसीकरण मोहीम

कोपर्डे हवेली : परिसरातील पाळीव जनावरांना गत आठ दिवसांपासून लाळीच्या साथीची लागण झाली आहे. अनेक शेतकरी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबर देशी उपाय करत असल्याचे चित्र दिसत आहे. लाळ ही वाऱ्याबरोबर पसरणारी साथ असल्याने अनेक जनावरांना लाळीची बाधा झाली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. सह्याद्री कारखान्याच्या कार्यस्थळावर लसीकरणाचे काम सुरू आहे. हवेत पसरणारा हा रोग असल्याने कित्येक किलोमीटर याची जनावरांना बाधा होत असते. त्यासाठी लाळीपूर्वी लसीकरण महत्त्वाचे असते; मात्र काही जनावरांचे लसीकरण राहिल्याने व पुन्हा लसीकरण न झाल्याने जनावरांना बाधा होते. बैल, म्हैस, गाय आदी जनावरांना लाळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. साथीची लागण झालेल्या जनावरांमध्ये अनेक लक्षणे दिसून येतात. जनावरांच्या जिभेला काटे येतात. तसेच तोंडातून लाळ गळते. जनावरे अशक्त बनतात. पायाच्या नख्यांना जखमा होतात. जनावरांचे अंग कापते. ताप येतो. शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये त्याची लस मिळते. जनावरे बरी होण्यासाठी सुमारे दहा- बारा दिवसांचा कालावधी लागतो. शेतकरी देशी उपाय म्हणून जनावरांना कोथिंबिर, केळी आदी खायला घालत आहेत. त्यामुळे जनावरांची लाळजाते. नख्यांना जखमा झालेल्या ठिकाणी गरम पाणी टाकत आहेत. तसेच किडे मारण्यासाठी पायावर रॉकेल शिंपडले जात आहे. पार्ले, कोपर्डे हवेली, उत्तर कोपर्डे, सह्याद्री कारखाना, नडशी, शिरवडे, वडोली निळेश्वर, शहापूर आदी गावांतील जनावरांना लाळ आली असून, शेतकरी लाळीचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करत आहेत. (वार्ताहर) गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जनावरे लाळीने बाधित झाली आहेत. आम्ही लसीकरणाचे काम हाती घेतले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांना लाळ आली आहे, त्यांनी तातडीने संपर्क साधावा. जनावरांवर वेळीच उपचार न झाल्यास दगावण्याची शक्यता असते.- डॉ. एस. के. शेगर, पशुवैद्यकीय अधिकारी, कोपर्डे हवेली