शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

.. ‘परिवर्तन’च्या हातात पतंग !

By admin | Updated: May 20, 2016 00:02 IST

‘भागधारक’ बसणार रिक्षात.. चिन्हांचे वाटप : प्रचाराची भिरकिट जोरदार; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी--सांगा, जनता बँक कोणाची..?

सातारा : जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भागधारक विरुद्ध परिवर्तन या दोन पॅनेलमध्ये सामना रंगणार आहे. एका अपक्षाने या निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी उमेदवारांच्या चिन्हांचे वाटप करण्यात आले. यामध्ये भागधारक पॅनेलला रिक्षा, परिवर्तन पॅनेलला पतंग तर अपक्ष उमेदवाराला कपबशी ही चिन्हे मिळाली आहेत. ही चिन्हे मिळताच दोन्ही पॅनेलतर्फे जोरकसपणे प्रचाराला गती दिली. सातारा शहरातील विविध पेठांमध्ये गुरुवारी दोन्ही पॅनेलचे उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत होते. ‘शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून हवे तसे निर्णय आणण्याचा कुटील उद्योग परिवर्तन पॅनेलतर्फे उघडकीस आणला जात आहे. ‘१९००० मतदारांना नाकारण्यात आल्याने भागधारक असलेल्या कुटुंबीयांमध्ये अन्यायाची भावना आहे. भागधारकांचा मतदानाचा व उमेदवारीचा हक्क डावलतानाच कोर्ट कब्जेदलालीपोटी बँकेचे लाखो रुपये बेदरकारपणे उडविण्यात आले आहेत. बँकेच्या विकासासाठीच्या योजना मतदारांपुढे लवकरच मांडणार आहोत,’ असे स्पष्टीकरण परिवर्तन पॅनेलचे प्रमुख प्रकाश गवळी यांनी प्रचारादरम्यान केले. यावेळी परिवर्तन पॅनेलचे उमेदवार व समर्थक उपस्थित होते.दरम्यान, ‘जनतेच्या न्यायालयातच जाऊन आम्ही दाद मागणार आहोत, आता जनताच न्यायनिवाडा करेल,’ असे स्पष्टीकरण भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी प्रचार फेरीवेळी केले. यावेळी भागधारक पॅनेलचे सर्व उमेदवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)दोन्ही पॅनेलकडून जोरदार प्रचार सुरूभागधारक पॅनेलच्या वतीने समर्थ मंदिर, यादोगोपाळ, शनिवार पेठ, शंकराचार्य मठ, माची पेठ या परिसरात गुरुवारी प्रचार फेरी राबविण्यात आली.परिवर्तन पॅनेलच्या वतीने शनिवार पेठ, कर्मवीर भाऊराव पाटील पथावरील शनिवार चौकातून ते पोवई नाका येथेपर्यंत व करंजे पेठेत प्रचार करण्यात आला.