शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राजधानीसाठी ‘राजे’ मैदानात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:49 IST

सातारा : पालिकेची पंचवार्षिक निवडणूक जवळ आल्याने सातारा पालिकेतील सत्तारूढ आघाडीने विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. दस्तुरखुद्द आघाडीप्रमुख खासदार ...

सातारा : पालिकेची पंचवार्षिक निवडणूक जवळ आल्याने सातारा पालिकेतील सत्तारूढ आघाडीने विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. दस्तुरखुद्द आघाडीप्रमुख खासदार उदयनराजे भोसले हेच मैदानात उतरल्याने शिलेदारांनी देखील मरगळ झटकली आहे. हद्दवाढीत पथदिव्यांचे उद्घाटन केल्यानंतर खासदारांनी कण्हेर योजना व पालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीकडे लक्ष केंद्रित केले असून, बुधवारी त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.

नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत सातारा पालिकेतील राजकीय घडामोडींकडे जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते; कारण निवडणुकीचा हा सामना खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रसिंहराजे या दोन बंधूंमध्ये रंगलेला असतो. यंदाही हा सामना तितकाच रोमांचकारी असणार आहे, याच शंका नाही.

निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या असताना आता सातारा पालिकेतील सत्तारूढ सातारा विकास आघाडी पूर्ण ताकतीने मैदान उतरली आहे. राजधानी काबीज करण्यासाठी आघाडीने शहरासह हद्दवाढीतील मूलभूत प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टांच्या पहिल्या टप्प्यात हद्दवाढीतील पथदिव्यांचे उद्घाटन खासदारांच्या हस्ते करण्यात आले. आघाडीप्रमुखच मैदानात उतरल्याने त्यांच्या शिलेदारांनीदेखील पायाला भिंगरी बांधली आहे.

‘आम्ही शब्द देत नाही तर तो पाळतोही’ असं सांगून खा. उदयनराजे यांनी विरोधकांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे. कण्हेर पाणी योजना, आवास योजना, पालिकेची नूतन प्रशासकीय इमारत अशा प्रमुख बाबींकडे सध्या खासदारांनी लक्ष केंद्रित केले आहे. येत्या काही दिवसांत कण्हेर योजनेचे उद्घाटन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तर पालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचादेखील लवकरच नारळ फोडण्याचे त्यांचे नियोजन आहे. निवडणुकीच्या निमित्ताने का होईना, परंतु आरोप-प्रत्यारोपांसह विकासकामांचा धडाका सुरू झाल्याने राजधानीतील वातावरण हळूहळू तापू लागले आहे.

(चौकट)

मंत्र्यांसोबत कमराबंद चर्चा

शहरातील विविध विकासकामे व योजनांच्या मंजुरीसाठी बुधवारी खा. उदयनराजे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची दरे (ता. महाबळेश्वर) या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये हद्दवाढीतील नियोजित कामे, पाणी योजना, मूलभूत सेवा-सुविधा, अजिंक्यतारा पायथ्याशी उभारण्यात येणारी संरक्षक भिंत, पालिकेची नूतन प्रशासकीय इमारत, नुकसानग्रस्तांचे पुनर्वसन अशा विविध विषयांवर सुमारे तासभर चर्चा झाली.

(चौकट)

राजकारण असो की वाहन

स्टिअरिंग आपल्याच हाती

मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी खा. उदयनराजे भोसले बुधवारी सकाळी शिवसागर जलाशयातून लॉँचने दरे या गावी गेले. या गावी जाताना त्यांनी चक्क लॉँचचे स्टिअरिंगच आपल्या हाती घेतले. राजकारण असो वा वाहन स्टिअरिंग हे आपल्याच हाती राहणार हे देखील त्यांनी यावेळी दाखवून दिले.