शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बालकाने चावा घेतल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला

By admin | Updated: June 12, 2015 00:47 IST

तिघांवर गुन्हा : क्षेत्रमाहुली येथील घटना

सातारा : सहा वर्षांच्या बालकाने चावा घेतल्याने अपहरणकर्त्यांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याला बेशुद्धावस्थेत फेकून देऊन त्यांनी पलायन केले. ही खळबळजनक घटना येथील क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथे दि. ९ रोजी घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लक्ष्मीबाई जाधव (वय ५०) या क्षेत्रमाहुली येथे वास्तव्यास आहेत. लग्नसमारंभ असल्याने त्यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी त्यांची मुलगी पाडेगाव, ता. खंडाळा येथून आली होती. नातू रोहन धोत्रे (वय ६) हा सुद्धा त्यांच्यासोबत क्षेत्रमाहुली येथे आला; परंतु आजीजवळ रोहन सोडून त्याची आई पाडेगावला निघून गेली. दरम्यान, मंगळवार, दि. ९ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास रोहन आजीच्या घराच्या पाठीमागे खेळत होता. त्यावेळी तेथे तीनजण आले. ‘आईकडे सोडतो,’ असे म्हणून एकाने रोहनला उचलून घेतले, तर दुसऱ्याने रोहनच्या अंगावर चादर टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चिमुकल्या रोहनने त्यांना विरोध करत आरडाओरड सुरू केला. तरी सुद्धा अपहरणकर्त्यांनी त्याला सोडले नाही. त्याला मारहाण करत रेल्वेस्टेशनजवळील नर्सरीमध्ये नेले. येथे त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये रोहनचे दोन दात पडले. एवढेच नव्हे तर तो बेशुद्ध पडला. हे पाहून अपहरणकर्त्यांनी त्याला तेथेच फेकून पलायन केले. रोहन दुपारपासून बेपत्ता असल्याचे आजीला समजले. त्यानंतर आजीने शोधाशोध सुरू केल्यानंतर रोहन रेल्वेस्टेशनच्या नर्सरीत सापडला. त्याला तत्काळ साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार आजी आणि पोलिसांना सांगितले. बोपले, ता. मोहळ, जि. सोलापूर येथील ‘काका’ नावाच्या व्यक्तीचे त्याने नाव सांगितले. तसेच अन्य दोनजण त्याच्यासोबत होते. असेही समोर आले आहे. परंतु ते नेमके कोण होते. रोहनच्या ओळखीचे कसे, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, पोलीस संबंधित अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)जवळच्या नातेवाइकांवर संशय !गेल्या पाच वर्षांपासून रोहनची आई पतीपासून विभक्त होऊन पाडेगाव येथे एकटीच राहात आहे. तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन जवळच्याच नातेवाइकांनी रोहनला पळवून नेण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय रोहनच्या आजीने पोलिसांपुढे व्यक्त केला आहे. त्या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत.