शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

कोरोना लसीकरणात खंडाळा तालुका अव्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:57 IST

खंडाळा : कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनासह आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न आहेत. या महामारीचा धोका टळला नसला तरी कोरोनाची लस ...

खंडाळा : कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनासह आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न आहेत. या महामारीचा धोका टळला नसला तरी कोरोनाची लस उपलब्ध झाल्याने काहीअंशी दिलासा आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३३ हजारजणांनी लस घेतली, तर उद्दिष्टांपैकी ९० टक्के काम पूर्ण करून खंडाळा तालुका जिल्ह्यात अव्वल राहिलाय.

सातारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस यंत्रणा, महसूल, शिक्षण विभाग, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना लस उपलब्ध करून दिली. यासाठी शासनाने दिलेल्या ऑनलाईन अ‍ॅपवर नोंदणी करणे आवश्यक होते. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ४६ हजार ११० कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ३२ हजार ९४० जणांनी लस घेतली आहे. यामध्ये १८ हजार ६९२ आरोग्य अधिकारी व कर्मचारी आणि १४ हजार २४८ ग्रामीण भागात क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सरासरी ७१ टक्के काम पूर्ण झालेले आहे. यामध्ये खंडाळा तालुक्यातील लसीकरण पथकाने दिलेल्या उद्दिष्टांपैकी ९० टक्के काम पूर्ण करून जिल्ह्यात अव्वल नंबर राखला आहे, तर सर्वांत कमी ५८ टक्के लसीकरण कोरेगाव तालुक्यात झाले आहे.

चौकट :

जिल्ह्यात तालुकावार नोंदणी केलेली संख्या. लस घेतलेली आरोग्य कर्मचारी संख्या. क्षेत्र कर्मचारी संख्या. लस घेतलेली एकूण संख्या. टक्केवारी खालीलप्रमाणे.

सातारा - ९८९६ - ३९८३ - ३३७९ - ७३९२ - ७४ %

फलटण - ३७९५ - १३०८ - १३३१ - २६३९ - ७० %

माण- २७०८ - ९६४ - १०८६ - २०५० - ७६ %

पाटण - ३६३९ - १२६३ - १११४ - २३७७ - ६५ %

कोरेगाव - ३०७२ - ११३६ - ६४८ - १७८४ - ५८ %

महाबळेश्वर - १७६० - ५०३ - ७२५ - १२२८ - ७० %

वाई - २७११ - ११९२ - १०७६ - २२६८ - ८४ %

खंडाळा - २०७३ - ९४८ - ९१४ - १८६२ - ९० %

खटाव - ३३२४ - ११२२ - १३१२ - २४३४ - ७३ %

कऱ्हाड - ११२५५ - ५६१७ - १८४० - ७४५७ - ६६ %

जावळी - १८७७ - ६५६ - ८२३ - १४७९ - ७९ %

कोट :

खंडाळा तालुक्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरळीतपणे सुरु आहे. ग्रामीण रुग्णालयात लसीकरण अधिकारी म्हणून शलाका ननावरे व स्मिता आरडे यांची टीम चांगले काम करीत आहे. काही लोकांना झालेला किरकोळ त्रास वगळता अन्य कोणालाही लसीकरणाचा त्रास झाला नाही. यापुढील मोहीमसुद्धा यशस्वीपणे राबविली जाईल.

- डॉ. रवींद्र कोरडे, वैद्यकीय अधीक्षक, खंडाळा ग्रामीण रुग्णालय

फोटो दि.२१खंडाळा कोरोना फोटो... (फोटो आवश्यक)

फोटो ओळ : जिल्ह्यात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे.

...........................................................