शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळा पोलिसांची पथके रवाना

By admin | Updated: December 23, 2014 00:30 IST

गूढ कायम : पुण्यातून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

खंडाळा : अहिरे, ता. खंडाळा येथील गत आठवड्यात गायब झालेल्या गायत्री जमदाडे या सहा वर्षीय बालिकेचा मृतदेह शनिवारी रात्री उशिरा आढळून आला. मात्र, तिच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. तिचा मृत्यू अकस्मात मयत होते की खून, याबाबत तपास सुरू आहे. या मृत्यूच्या तपासासाठी खंडाळा पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पुणे येथून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.गायत्री जमदाडे ही दि. १४ रोजी अहिरे येथून गायब झाली होती. आठ दिवस पोलिसांनी तपास केला. मात्र, कोठेही ती मिळून आली नाही. शनिवारी वीर धरणाच्या उजवा कालव्यात तिचा मृतदेह आढळला; परंतु तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. त्यासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. परंतु, त्याचा अहवाल प्राप्त झाला नाही. अतिशय छिन्नविच्छिन्न व सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने पोलिसांना तपास करणे जिकिरीचे बनले आहे. गुन्हे अन्वेषण पथकाने घटनास्थळी पाहणी करून श्वानपथकामार्फत माग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापतरी काहीच हाती लागले नाही. विविध ठिकाणी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. गायत्री अचानक गायब होण्यामागच्या कारणाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच तिला पळवून नेले असेल तर हे कृत्य कोणाचे व त्याच्या हेतूचाही शोध घेत आहेत. खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)