शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खंबाटकी घाटात धोक्याची घंटा कायम

By admin | Updated: February 2, 2015 00:02 IST

संरक्षक कठड्यांची दुरवस्था : लोखंडी खांबही टिकेनात; प्रशासकीय यंत्रणा मेटाकुटीला!

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील तुटलेले संरक्षक कठडे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत. यावर पुन्हा-पुन्हा दुरुस्ती करूनही वाहन ठोकरल्याने कठडे कोसळले जात आहेत. म्हणून ‘न्हाय’च्या प्रशासनाने घाटातील जागोजागी तुटलेल्या कठड्यांच्या जागी लोखंडी खांब व लोखंडी रोप बसवले आहेत. मात्र, वेगाने येणारी वाहने व जड वाहनांमुळे ही उपाययोजनाही कुचकामी ठरत आहे. संरक्षक कठडे आज बसविले की, उद्या ते तुटत आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणाही मेटाकुटीला आली आहे. खंबाटकी घाटातील वळण रस्त्यांवर तुटलेल्या संरक्षक कठड्यांमुळे प्रवास करणे धोकादायक बनले होते. याबाबत ‘लोकमत’मधून अनेकदा आवाज उठविला होता. त्यानंतर हायवे प्रशासनाने दखल घेत संरक्षक कठड्यांऐवजी लोखंडी खांब रोवून रोप लावले होते. मात्र वळण रस्त्यावर जड वाहने, कंटेनर वळविताना रस्ता अरुंद असल्याने हे उभारलेले कठडे वारंवार तुटले जातात. वास्तविक प्रत्येक शनिवार व रविवारी महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांमुळे घाटात वाहनांची संख्या वाढत असते. अशावेळी जड वाहनांमुळे घाट ठप्पही होत असतो.वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढण्याच्या नादात हे कठडे तुटले जातात. त्यामुळे वारंवार ते दुरुस्त करावे लागतात. यासाठी लोखंडी ग्रीलचे कठडे उभारले; मात्र तेही जड वाहनांमुळे मोडकळीस आले आहेत. या समस्येवर उपाय म्हणून वळणावरील रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. आजही घाटातील काही ठिकाणी तुटलेल्या कठड्यांच्या जागी केवळ रिफ्लेक्टर कापडी पट्ट्या लावलेल्या आहेत. मात्र याठिकाणी भक्कम संरक्षक कठड्यांचे बांधकाम होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जड वाहनांना वळण रस्त्यावर सूचना फलक लावले गेले पाहिजेत. तसेच हलक्या वाहनांना वेगमर्यादा ठेवली पाहिजे. घाटातील किमान सुविधांवर प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ व प्रवाशांमधून होत आहे. (प्रतिनिधी)पडझड कायमखंबाटकी घाटात संरक्षक कठड्यांची दुरवस्था आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर लोखंडी संरक्षक यंत्रणा उभारली गेली; मात्र जड वाहनांमुळेही वारंवार तुटली जात आहे. संरक्षक कठडे उभारण्याबरोबरच वळण रस्त्याचे रुंदीकरण झाले तर या समस्येवर तोडगा निघेल,जड कंटेनर वळणावर बसत नाहीत, त्यामुळे अनेकदा घाट ठप्प होतो, असे खंबाटकी मदत पथकाचे अध्यक्ष अजित यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.