शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी आघाडी तोडणार याची कुणकूण होती

By admin | Updated: September 28, 2014 00:33 IST

कऱ्हाडात गौप्यस्फोट : अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्र्यानी साधला पत्रकारांशी संवाद

कऱ्हाड : ‘सत्तेची समीकरणे बदलण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार आहे़ कोणी उघड-उघड, तर कुणी पडद्यामागून समीकरण बदलत असतो.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी मान्यवर नेत्यांसमोर उमेदवार उभे करताना काळजी घेतली आहे़ त्यामुळे भाजप, राष्ट्रवादीचे साटेलोटे आहे का, याचा जनताच आता शोध घेईल,’ असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले़ कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला़ त्यानंतर निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्याबरोबरची आघाडी तोडायचीच होती़ त्यामुळे आसुरी महत्त्वकांक्षा ठेवून अशक्य अटी निवडणुकीपूर्वीच आमच्यावर लादण्याचा त्यांचा प्रयत्न होता़ त्याला प्रतिसाद देणे शक्यच नव्हते़ राष्ट्रवादी तर युतीच्या निर्णयाची वाट पाहत होती़ युती तुटली रे तुटली की, त्यांनी आघाडी तोडून टाकली; पण मला याची अगोदरच कुणकूण असल्याने त्याची काळजी वाटली नाही़ सत्तेसाठी आघाडी तुटली; पण सत्तेसाठी पुन्हा आघाडी होऊ शकते का? या प्रश्नावर मात्र अगोदर निवडणुका होऊ द्यात; मग त्या प्रश्नाचे उत्तर देऊ.’ पश्चिम महाराष्ट्रात सेना, भाजपची म्हणावी तशी ताकद नाही मग दोन्ही काँग्रेसपैकी हा गड कोण राखणार, असे विचारताच, ‘काँग्रेसची तयारी चांगली आहे़ त्यामुळे चिंता वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले़ दक्षिणेत काँग्रेसविरुद्ध काँग्रेस असेच चित्र दिसतेय कारण फक्त अतुल भोसले भाजपात, अजिंक्य पाटील सेनेत, तर आमदार उंडाळकर बंडखोरीत दिसतायत ? याबाबत विचारले असता, ‘महत्त्वकांक्षेला कोणी आवर घालू शकत नाही़ ज्यांच्याकडे प्रचंड आर्थिक ताकद आली आहे, अशा प्रत्येकाला आता आमदार व्हावे, असे वाटत आहे़ मग ती अपक्ष राहतील, तर काही पक्षांची उमेदवारी ताकदीचा वापर करून मिळवतील; पण आता राज्यात राष्ट्रीय पक्षाचीच सत्ता असणे विकासाच्यादृष्टीने गरजेचे आहे़’ निवडणुकीत भाजप हाच आमचा प्रमुख विरोधक आहे़ कारण देशात त्यांचे सरकार आहे़ ११४ मतदारसंघांत आम्ही गेले दहा-बारा वर्षे लढलेलो नाही़ त्यामुळे तेथे उमेदवार निवडताना सामाजिक न्याय अन् सक्षम उमेदवार देताना थोडी कसरत करावी लागली एवढेच ! घोळ किंवा उमेदवार मिळत नव्हते, असं काहीही नाही़’ (प्रतिनिधी)