शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

केळघर घाटात कोसळली दरड; सत्र सुरूच

By admin | Updated: August 14, 2014 00:05 IST

महाकाय दगड रस्त्यावर पडला व नंतर सुरक्षा कठडा तोडून दरीत कोसळला.

मेढा : सातारा-महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर घाटात काळ्या कड्यानजीक रेंगडी गावाजवळ आज, बुधवारी सकाळी नऊ वाजता दरड कोसळली. या रस्त्यावर एरव्ही मोठी वाहतूक असते; मात्र सुदैवाने ही घटना घडताना कोणतेही वाहन त्याठिकाणी नसल्याने जीवित व वित्तहानी टळली. हा महाकाय दगड रस्त्यावर पडला व नंतर सुरक्षा कठडा तोडून दरीत कोसळला.केळघर घाटात काळ्या कड्यानजीक दरड कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आज सकाळी दरडीचा मोठा दगड व आणखी काही भाग अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जावळीचे तहसीलदार रणजित देसाई, बांधकाम विभागाचे अभियंता एस. जी. शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी मशीनच्या साह्याने पडलेले दगड बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच येथे दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. यानंतर या परिसरातील रेंगडी गावानजीक सुमारे १०० ते १५० मीटर परिसरात जमिनीला भेगाही पडल्या होत्या. घटनास्थळी जावळी पंचायत समितीच्या सभापती रूपाली वारागडे, उपअभियंता जे. डी. पाटील, स्थापत्य अभियंता विभागाचे कांता जाधव, आदींनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. (प्रतिनिधी)