शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कवठेच्या संघर्ष क्लबची संगमेश्वरवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:36 IST

महाराष्ट्र व रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या सहकार्याने व विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट स्पोर्ट्स अकॅडमी, रत्नागिरी यांच्या वतीने या ...

महाराष्ट्र व रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या सहकार्याने व विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट स्पोर्ट्स अकॅडमी, रत्नागिरी यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कवठेतील संघर्ष क्लब व रत्नागिरीतील संगमेश्वर संघात अटीतटीचा सामना होऊन संघर्ष क्लबने विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पार्थ कळसकर व उत्कृष्ट आक्रमक म्हणून आदित्य साळुंखे यांची निवड झाली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत पुणे, मुंबई, ठाणे, वाळवा, कुपवाड, विटा, सोलापूर, रत्नागिरी, भडकंबे, शिवनगर, आदी प्रमुख संघांबरोबर अन्य सुमारे २५ संघ सहभागी झाले होते.

विजयी संघास संदीप तावडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा खो-खो अमॅच्युअर असोसिएशनचे सरचिटणीस महेंद्र गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती. संघनायक श्रेयस चव्हाण, पार्थ कळसकर, विजय चव्हाण, आदित्य साळुंखे, प्रवीण यादव, गणेश साळुंखे, रितेश जाधव, रेवननाथ यादव, सागर मसुगडे, संकेत गुरव, पीयूष चव्हाण, आर्यन माने, वेदान्त साळुंखे व सार्थक केंजळे या खेळाडूंनी नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन घडवत चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले. खेळाडूंना कोच लखन साळुंखे, शशिकांत चव्हाण, ऋषिकेश यादव, दत्तात्रय कमाने, स्वप्निल साळुंखे, संजय साळुंखे, प्रसाद साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.

- चौकट

गावात संघाचे जल्लोषात स्वागत

विजयी संघाचे कवठेनगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. खेळाडू व मार्गदर्शकांचे कवठे, नवीन कवठे, केंजळ येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, शाम-शरद शिक्षण प्रसारक संस्थेचे ज्योतिर्लिंग विद्यालय, ग्रामस्थ तसेच क्रीडाप्रेमींच्या वतीने सत्कार करण्यात आला.

फोटो : १८केआरडी०२

कॅप्शन : कवठे (ता. कऱ्हाड) येथील संघर्ष क्लबने डेरवणमध्ये झालेल्या खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावले.