शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

‘कास’ची ‘टेस्ट’ सुरू!

By admin | Updated: June 8, 2016 00:19 IST

उंची वाढविणार : जिहे-कटापूर धरण विभागामार्फत कामाला वेग

पेट्री : ‘शहराच्या पश्चिमेस सातारा-बामणोली मार्गावर २५ किलो मीटर अंतरावर कास तलाव आहे. सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावाची उंची वाढविण्याच्या दृष्टीने प्राथमिक तपासणीत माती, दगडाचे नमुने सॉईल टेस्ट मशीनद्वारे घेण्यास गेल्या तीन-चार दिवसांपासून जिहे-कटापूर प्रकल्प उपविभाग, सातारा यांच्याकडून सुरुवात झाली असून, हे नमुने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. कास तलाव उंची वाढविण्याच्या अनुषंगाने या टेस्ट घेतल्या जात आहेत. मात्र, केवळ तपासणी म्हणून आम्ही हे काम हाती घेतले आहे,’ अशी माहिती जिहे-कटापूर योजनेचे कार्यकारी अभियंता शरद गायकवाड यांनी दिली. कास तलावानजीक खालील बाजूस माती व दगडाचे नमुने घेण्यासाठी एकूण नऊ ठिकाणे निश्चित केलेली असून, सध्या चार ठिकाणी सॉईल टेस्ट मशीनद्वारे माती व दगडाचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. तदनंतर उर्वरित पाच ठिकाणचे दगड, मातीचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत. या मशीनद्वारे १२० फूट खोल जाऊन तीन मीटरवर माती, त्या खालोखाल साडेचार मीटरवर जांभा खडक, त्याखाली साडेचार ते सहा फुटावर परत माती असे नमुने प्लास्टिक पिशवीत घेऊन पाटबंधारे विभागाकडे पाठविले जाणार आहेत, अशी माहिती घटनास्थळी सुरू असलेल्या कामावरील कामगाराने सांगितली. तसेच काळा खडक लागल्यांनतर त्याखाली पाच मीटर पर्यंतच्या तपासणीसाठी नमुने घेतले जाणार आहेत. जिहे-कटापूर धरण विभागामार्फत कास धरण उंची वाढविण्याचे काम केले जाणार आहे. (वार्ताहर)अनेक समस्यांना पूर्णविराम..!कास तलावाची उंची वाढवल्याने धरणात जास्त प्रमाणात पाणीसाठा वाढला जाणार आहे. तसेच तलावाच्या दक्षिणेस खालील बाजूस असणाऱ्या संरक्षक पुलावरून तीन ते चार फुटांपर्यंत पावसाळ्यात पाणी वाहून दिवस दिवसभर वाहतूक थांबून पुला पलीकडील गावे संपर्कहीन होतात. तसेच काहीजण जीव मुठीत धरून कंबरे एवढ्या पाण्यापलीकडे जातात. त्यामुळे एखादी विपरित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धरणाची उंची वाढविल्यानंतर या समस्या सुटल्या जाणार आहेत.भूगर्भातल्या स्तराची तपासणी करून जो अभिप्राय कार्यालयास प्राप्त होईल त्यानुसार पायाची खोली निश्चित करून राष्ट्रीय हरित प्राधिकरणाची परवानगी आल्यानंतर साधारण दिवाळीत कामास सुरुवात होईल. भूगर्भाच्या स्तराचे नमुने तपासणीसाठी एकूण नऊ छिद्रांपैकी चार छिद्रांचे काम संपत आले असून, उर्वरित काम दहा ते बारा दिवसांत पूर्ण होईल.- ए. जी. मोमीन, शाखा अभियंता जिहे-कटापूर प्रकल्प उपविभाग सातारा.