शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

कऱ्हाडला पन्नास गावांना टंचाईच्या झळा !

By admin | Updated: March 20, 2017 23:40 IST

संभाव्य पाणीटंचाईचा आढावा : लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिकांची बैठक; सतरा गावांत जाणवणार तीव्र टंचाई

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील सध्याच्या व संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी सोमवारी येथील यशवंतराव चव्हाण बचत भवनमध्ये बैठक आयोजित करण्यात आली. तालुक्यातील पन्नासहून अधिक गावांना यावर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता या बैठकीत व्यक्त करण्यात आली. तसेच टंचाईवर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवरही सकारात्मक चर्चा करण्यात आली. पाणी पुरवठ्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.यावेळी प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके, सभापती शालन माळी, उपसभापती रमेश देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदय पाटील, मानसिंगराव जगदाळे, पंचायत समिती सदस्या सुरेखा पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांची उपस्थिती होती.आमदार चव्हाण म्हणाले, ‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या जाणवणार असल्याचे दिसून येत आहे. सध्या सतरा गावांमध्ये अतितीव्र पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती दूर करण्यासाठी येणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येबाबत ग्रामसेवक, तलाठी व अधिकाऱ्यांनी दक्षता पाळावी व गावांचा आराखडा तयार करून उपाययोजना करण्यास सुरुवात करावी.सध्या साडेतीन महिने पाणीटंचाईची परिस्थिती भासेल, असे चित्र दिसून येत आहे. दि. १३ जुलै २००५ रोजी पाणीपुरवठा विभागास एक आदेश प्राप्त झाला. यामध्ये संबंधित काळातील मंजूर व सुरू असलेल्या योजनांच्या कामांना पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगिती देण्यात यावी, असे सांगण्यात आले. याबाबत नागपूर येथे अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन चर्चाही करण्यात आली. मात्र, त्यावेळी ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे जोपर्यंत योजनांच्या कामांच्या स्थगितीचा आदेश उठत नाही, तोपर्यंत योजनांची कामे बंदच राहणार आहेत. सध्या दि. ३१ मार्चपर्यंत जल सर्वेक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांचे ग्रामसेवक, तलाठी व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ सर्वेक्षण करावे. जेणेकरून टंचाईचा आराखड्यात गावांचा समावेश केला जाईल व संबंधित गावांमध्ये कामे तत्काळ सुरू केली जातील आणि ज्या गावांतील ग्रामपंचायतींकडून पाण्याचे एटीएम मशीन बसविण्यासाठी मागणी होईल त्या गावांना शुद्ध पाण्याचे एटीएम मशीन देण्यात यावेत.’यावेळी प्रांताधिकारी किशोर पवार म्हणाले, ‘ज्या गावांमध्ये पाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कऱ्हाड तालुक्याचा २०१७-१८ वर्षाचा पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्या आराखड्यामध्ये अद्यापपर्यंत शासनाने समाविष्ट केलेली गावे सोडली तर इतर गावांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या ज्या गावांचा समावेश करावयाचा बाकी राहिला आहे. तसेच ज्या गावांत तीव्र पाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा गावांचा दोन दिवसांत सर्व्हे करून त्या गावांचे ठराव व प्रस्ताव तत्काळ प्रशासनास ग्रामसेवक व तलाठी, मंडलअधिकाऱ्यांनी सादर करावे.’कऱ्हाड पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एम. डी. आरळेकर यांनी कऱ्हाड तालुक्याचा आढावा सादर केला. त्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनांच्या माध्यमातून तसेच चौदाव्या वित्त आयोगातून करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या कामांची माहिती दिली. तसेच तालुक्यात २२२ गावे असून, १९८ ग्रामपंचायती आहेत. तर तालुक्याची ग्रामीणची लोकसंख्या ही ५ लाख ८४ हजार ८५ इतकी आहे. तालुक्यात सरासरी पर्जन्यमान हे ६३० मिलीमीटर आहे. तालुक्यात प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना या चार तर स्वतंत्र पाणीपुरवठा योजना २७२ आहेत. लघु नळ पाणीपुरवठा योजना या १५० आहेत. हातपंपांच्या संख्या ही १ हजार २४६ इतकी असल्याची माहिती उपअभियंता आरळेकर यांनी दिली.आढावा बैठकीदरम्यान गोसावेवाडी, घोलपवाडी व कोरिवळे या तीन गावांमध्ये भीषण पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावांत टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. येथील ग्रामस्थांच्या पाणीटंचाईचा प्रश्न प्रशासनाने मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी केली. यावेळी विहिर खोलीकरण व रूंदीकरण कामाचे टंचाई आराखड्यातून नाव निगडी गावचे नाव वगळण्यात आले असल्याची माहिती दिली. शासनादरबारी नुसती कागदोपत्रीच कामे होत असून प्रत्यक्षात मात्र केली जात नसल्याचे सांगितले. यावेळी पाणी पुरवठाचे उपअभियंता महेश आरळेकर यांनी नवीन वर्षात नवीन प्रस्ताव सादर करण्याची मागणी सरपंचांना दिली. यावेळी सुपने येथील दूषित पाणी पुरवठ्याबाबत सदस्या सुरेखा पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. गावाबाहेरील नदीतून विहिरीत पाणी सोडले जात असून त्या विहिरीतून शुद्धीकरण न करता तसेच पाणी पिण्यासाठी ग्रामस्थांना सोडले जात आहे. पिण्याअयोग्य पाणी सोडले जात असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावास शुद्ध पाण्याची एटीएम मशीन देण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी कालेटेक, जुजारवाडी, चचेगाव, नांदगाव, पवारवाडी, मनव, बामणवाडी, आेंड, घारेवाडी, अंतवउी, रिसवड, गोसावेवाडी, किवळ, सयापूर, करंजोशी अशा तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेल्या गावांतील पाणी प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.या बैठकीस तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व पाणी पुरवठा योजनेतील अधिकारी, ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती. (प्रतिनिधी)या गावांनाही बसतील झळा..कऱ्हाड तालुक्यातील पेरले, महारुगडेवाडी, टाळगाव, अंतवडी, कुसूर, खोडशी, शिंदेवाडी, घारेवाडी, कोरेगाव, धावरवाडी, खालकरवाडी, कोळे, रिसवड, नांदगाव, पोतले, काले, उत्तर कोपर्डे, शिंगणवाडी, शेरे, पवारवाडी, नांदलापूर, कवठे, आरेवाडी, बेलदरे, दुशेरे, अंधारवाडी, खुबी, म्हासोली, जुळेवाडी, कालेटेक, ओंडोशी, गोंदी, सयापूर, चचेगाव, भवानवाडी, ओंड, वानरवाडी, बामणवाडी, हरपळवाडी, करंजोशी, वराडे, गायकवाडवाडी, पाडळी-हेळगाव, बानुगडेवाडी, मनू व गोसावेवाडी या गावांना येत्या काही दिवसांत टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत. संबंधित ग्रामपंचायतींनी गाव टंचाईग्रस्त घोषित करण्यासाठी ठराव सादर केले आहेत.तीन गावांना टँकरने पाणीगोसावेवाडी, घोलपवाडी व कोरिवळे या तीन गावांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच गमेवाडी येथील विहिरीचे खोलीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजित बैठकीत देण्यात आली.