शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

बैठकीच्या पत्राला केराची टोपली

By admin | Updated: July 27, 2014 23:07 IST

पाटण : उपसभापींच्या मागणीकडे कृषिअधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष

पाटण तालुका पाणलोट भ्रष्टाचार : ‘लोकमत’ने आवाज उठवला होता. पाटण : तालुक्यात राबविण्यात ओल्या पाणलोट प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची गंभीरबाब ‘लोकमत’ने उजेडात आणताच पंचायत समितीच्या पाणलोटच्या स्वतंत्र बैठकीची मागणी केली होती; परंतु उपसभापतींच्या पत्राला केराची टोपली दाखविण्याचे काम कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. तालुक्यात के. आर. १७ अंतर्गत मेगा पाणलोट प्रकल्प २००९-२०१० साली मंजूर झाला. तालुक्यात सुमारे १७ कोटी या प्रकल्पाअंतर्गत मंजूर झाले. कृषी विभागाच्या इतिहासात पहिल्यादांच एवढा मोठा निधी मंजूर झाल्याने प्रकल्पाचे निर्देश गुंडाळून कृषी अधिकाऱ्यांनी संगनमताने प्रकल्पात जाणीवपूर्वक भ्रष्टाचार केला आहे.तालुक्यातील त्रिपुटी, चोपडी, मूळगाव, कवरवाडी, गुंजाळी, नेरळे, किल्ले मोरगिरी, झाकडे, लेंढोरी, मणेरी, नाव गोठणे, झाडोली, कामटगाव, हुंबरळी, मेंढेघर, गोकूळ, हेळवाक, नेचल, शिवंदेश्वर, काडोली या गावांमध्ये पाणलोटची कामे करण्यात आली होती.मृदसंधारण कामासाठी प्रकल्पाच्या ९६ टक्के निधी सुमारे नऊ कोटी खर्च करण्यात आले आहेत. तर प्रकल्पाअंतर्गत उपजीविका कार्यक्रमासाठी १९ टक्के म्हणजे, सुमारे तीन कोटी मंजूर झाले होते. प्रशासकीय निधी म्हणून दहा टक्के, प्रेरक प्रवेश उपक्रम चार टक्के, संस्थाक्षमता बांधणी पाच टक्के, सनियंत्रण कार्यक्रम, मूल्यमापन प्रकल्प अहवाल यासाठी एक टक्के, तर राखीव निधी तीन टक्के असे सुमारे १७ कोटींची कामे पाणलोट प्रकल्पाअंतर्गत तालुक्यात करण्यात आली होती. यात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या होत्या. याबाबत सातत्याने ‘लोकमत’ने आवाज उठवला होता. मृद व जलसंधारण कामात अधिकाऱ्यांनी अर्थिक हित डोळ्यांसमोर ठेवून तांत्रिक बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने प्रकल्पाचा उद्देश बाजूला पडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रारी करून ही दाद मिळाली नाही. परिणामी ठेकेदाराने बिले काढून कोट्यवधींचा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांच्या संगनमताने केला आहे. तर पंचायत समितीच्या उपसभापतींनी कृषी अधिकाऱ्यांनी प्रकल्पासाठी स्वतंत्र बैठक लावण्याचे लेखी आवाहन आदेश ही दि. ३० जून रोजी दिले होते. परंतु लोकप्रतिनिधींच्या आदेशाला हारताळ फासण्याचे काम कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. अजूनही बैठकीचे आयोजन संबंधित अधिकाऱ्यांनी केले नसल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)