शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडातील आयलँडचे सुशोभिकरण हवे.!

By admin | Updated: May 3, 2017 23:20 IST

कऱ्हाडातील आयलँडचे सुशोभिकरण हवे.!

कऱ्हाड : शहरात अधिकाधिक विकास व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने येथील पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. सध्या शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते डांबरीकरण करून चकाचक केले जात आहेत. मात्र, शहरातील चकाचक रस्त्यांवरील पाच आयलँड हे अजूनही सुशोभिकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचा केवळ जाहिरातीसाठीच वापर केला जात आहे. कऱ्हाड शहरातील मुख्य पाच ठिकाणी पालिकेकडून त्रिकोणी तसेच गोलाकार आकाराचे आयलँड बांधण्यात आले. शहरातील सौंदर्यात भर पडावा व चौकांना सौंदर्य प्राप्त व्हावे हाच केवळ उद्देश त्यावेळी पालिकेने समोर ठेवला होता. आयलँड बांधल्यानंतर त्याची सुरुवातीला नियमितपणे डागडुजी व फुलझाडांची निगाही राखण्यात आली. नियमित पाणी घालून आयलँडची निगा राखण्याकडे पालिका लक्ष देत होती. आता मात्र, पालिकेने या आयलँडच्या डागडुजीबरोबर फुलझाडांकडेही दुर्लक्ष केले आहे.शहरात सध्या कोल्हापूर नाका, दत्त चौक, पंचायत समिती चौक, कृष्णा नाका तसेच कामगार चौक या पाच ठिकाणी गोलाकार व त्रिकोणी आयलँड आहेत. त्यांची अवस्था ही असून अडचण आणि नसून खोळंबा, अशी झाली आहे. या आयलँडचे संरक्षक कठडे, जाळी तुटलेली असून, गवतही वाळले आहे. तसेच फुलझाडेही नाहीशी झाली आहेत. दिवसाढवळ्या शहरातील मोकाट जनावरे या आयलँडमधील वाळलेले गवत खात आहेत. तर पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांकडूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा परिस्थितीमुळे शहरात येणाऱ्या नागरिकांकडून व प्रवाशांकडून या आयलँडच्या अवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.१९९९ नंतर शहरातील सुधारणेकडे पालिकेकडून लक्ष देण्यास कार्यवाही सुरू करण्यात आली. शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे, शहरातील चौकातील आयलँडचे सुशोभिकरण करणे, दुभाजकावरती फुलझाडे लावणे तसेच पादचारी मार्गांची निगा राखणे अशी कामे पालिकेकडून शहरात करण्यात आली. त्याअंतर्गत शहरात पाच ठिकाणी आकर्षक आयलँड उभारण्यात आली.कोल्हापूर नाका येथे शहराच्या प्रवेशद्वारावर त्रिकोणी आकाराचे आयलँड बांधण्यात आले. त्याची अवस्था आता अत्यंत बिकट बनली आहे. या ठिकाणी असलेल्या आयलँडची डागडुजी करण्यात येणार असल्याचे सुरुवातीला पालिकेकडून सांगण्यात आले होते. आता मात्र, आयलँडकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. यापेक्षा गंभीर परिस्थिती दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील आयलँडची झाली आहे. दगडी बांधकाम करण्यात आलेल्या या आयलँडमध्ये पालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या पाईप तसेच जॅकवेल बसविण्यात आलेल्या आहेत. या आयलँडमधील जॅकवेलचे काम काही महिन्यांपूर्वी पालिकेकडून करण्यात आले. कामासाठी या ठिकाणी आयलँडचे संरक्षक कठडे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तोडले. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा संरक्षक कठड्यांची डागडुजीही कर्मचाऱ्यांनी केली नाही. त्यामुळे आयलँडचे कठड्याचे दगड रस्त्यावर ढासळले असून, ते वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत.याप्रमाणे शहरातील कृष्णा नाका व कामगार चौकातील आयलँडच्या संरक्षक जाळ्यांना गंज चढला असून, त्यातील गवतही वाळले आहे. तसेच फुलझाडेही नाहीशी झाली आहेत. कामगार चौकातील आयलँड तर वडापवाहनांच्या गराड्यात अडकला आहे. याच्या चोहो बाजूने वडापच्या गाड्या उभ्या केल्या जात आहेत. तर पंचायत समिती परिसरात रेव्हिन्यू क्लबसमोर बांधण्यात आलेल्या आयलँडवर तर बिनधास्तपणे जाहिरातींचे फलक अडकवून जाहिरातींची प्रसिद्धी केली जात आहे. अशा प्रकारे शहरातील आयलँडची दुरवस्था झाली असून, त्याकडे पालिकेक डून दुर्लक्ष केले जात आहे. या आयलँडची दुरुस्ती करून पालिकेने शहरातील सौंदर्य वाढविण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)