शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

मांजरांमुळे लागली सख्या भावांमध्ये ‘कळवंड’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:40 IST

सातारा : आजपर्यंत आपण सख्या भावांची भांडणे मालमत्ता व जमिनीवरून झाल्याचे पाहात आलो आहोत. मात्र, दोन मांजरे संख्या भावांमध्ये ...

सातारा : आजपर्यंत आपण सख्या भावांची भांडणे मालमत्ता व जमिनीवरून झाल्याचे पाहात आलो आहोत. मात्र, दोन मांजरे संख्या भावांमध्ये वादाचे कारण ठरू शकतात, हे पहिल्यांदाच पहायला मिळतेय.

मांजराने दिलेल्या त्रासामुळे दोन सख्या भावांच्या कुटुंबांत मिठाचा खडा पडला असून, धाकट्या भावाच्या कुटुंबाला मदल्या भावाने मारहाण केल्याचा प्रकार तळीये, ता. कोरेगाव येथे घडली. ज्या मांजरांनी ही भांडणे लावली, ती मांजरे मात्र नामानिराळी राहिली. परंतु मारहाण केल्यामुळे तिघांवर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तळीये, ता. कोरेगाव येथील अहमद शेख (वय ४३) हे वडाप विक्रेते आहेत. घराशेजारीच त्यांच्या भावाचे घर आहे. शेख यांच्या घरावरील पत्रा खराब असल्यामुळे त्यांनी पत्र्यावर प्लास्टिकचा कागद अंतरला आहे. हा कागद त्यांच्या भावाने पाळलेली दोन मांजरे कुरतडत असल्याचे अहमद शेख यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी भावाच्या मुलीला या मांजरांचा बंदोबस्त कर, असे सांगितले. याच कारणावरून दोन भावांमध्ये चांगलीच जुंपली. शेख यांना दांडक्याने रक्तबंबाळ होइपर्यंत मारहाण करण्यात आली. तर त्यांची पत्नी आणि मुलगा हा वाद सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.

दोन मांजरांमुळे शेख कुटुंबामध्ये झालेला वाद अखेर वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात पोहोचला. अहमद शेख यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शरप्पूऊ शेख, साहील शेख, हिना शेख (सर्व रा. तळीये, ता. कोरेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला. तळीये परिसरात मात्र, सख्या भावांमध्ये मांजरांमुळे लागलेली कळवंड चर्चेचा विषय ठरली.