शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्सी संपात अख्खे महाबळेश्वर सामील

By admin | Updated: February 16, 2016 00:02 IST

शंभर टक्के बंद : ‘रेंट ए मोटारसायकल’ चालू देणार नाही; आश्वासनानंतर टॅक्सीचालकांचे आंदोलन मागे

महाबळेश्वर : एका धनिकासाठी शहरातील गोरगरीबांच्या उदरनिवार्हाचे प्रमुख साधन असलेला टॅक्सी व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न मी उधळून लावू. कोणत्याही परिस्थितीत रेंट ए मोटारसायकल चालू देणार नाही. स्थानिक लोकांचा रोजगारावर प्रथम हक्क आहे, तो हक्क कोणी हिरावून घेत असेल तर याचे परिणाम गंभीर होतील, असा सज्जड इशारा खा. उदयनराजे भोसले यांनी दिला. दरम्यान, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक वैशाली चव्हाण यांनी टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन विभाग सातारा यांची संयुक्त बैठक होईपर्यंत रेंट ए मोटारसायकल सुरू करण्यात येणार नाही, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.परिवहन विभागाने दिलेल्या रेंट ए मोटारसायकल परवान्याला विरोध करण्यासाठी सोमवारी टॅक्सी संघटनेने पुकारलेल्या महाबळेश्वर बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. टॅक्सी संघटनेने शहरातून खा. उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. राज्य शासनाने पर्यटनाला चालना देण्यासाठी महाबळेश्वर व पाचगणी या दोन शहरात रेंट ए मोटार सायकल व्यवसाय करण्यासाठी एका खासगी संस्थेला परवाना दिला आहे. टॅक्सी संघटनेचा विरोध डावलून रेंट ए मोटारसायकल या व्यवसायाचे उद्घाटन करण्याचा घाट घातला आहे. याला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. टॅक्सी स्थानकावरील दत्त मंदिरापासून मूक मोर्चाला प्रारंभ झाला. खा उदयनराजे भोसले यांच्यासह नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, जि. प. सदस्य बाळासाहेब भिलारे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, उपसभापती संजय गायकवाड, उपनगराध्यक्ष संतोष आखाडे, माजी नगराध्यक्ष किसनशेठ शिंदे, नगरसेवक संतोष शिंदे, संदीप साळुंखे, प्रकाश साळुंखे, लीलाताई मानकुंबरे, अर्बन बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब कोढाळकर, शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख राजेश कुंभारदरे, अध्यक्ष दत्तात्रय वाडकर, समन्वय समितीचे अध्यक्ष प्रवीण भिलारे, विकास शिंदे, सुनील काटकर, सज्जाद वारूणकर, अतुल सलागरे, अफजल सुतार, सुभाष कारंडे, समीर सुतार, विशाल तोष्णीवाल आदी मान्यवर उपस्थित होते. हा मोर्चा बाजारपेठ मार्गे बसस्थानकावर आला. तेथे उदयनराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)धरणे अन् ठिय्याखासदार उदयनराजे यांच्यासह सर्वजण बसस्थानक परिसरात आले व तेथे रस्त्यावर बसून रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर पर्यटन विकास महामडळाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची कल्पना अधिकाऱ्यांना नव्हती. त्यांनी या आंदोलनाची माहिती वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक वैशाली चव्हाण यांना कळविली. त्यांनी रेंट ए मोटारसायकल या व्यवसायाचा उद्या होणारा उद्घाटन सोहळा रद्द् करण्यात आल्याचे तसेच टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन विभाग सातारा यांची संयुक्त बैठक होईपर्यंत रेंट ए मोटारसायकल सुरू करण्यात येणार नाही, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष अनंत पारठे, सचिव चंद्रकांत बावळेकर, पाचगणी टॅक्सी संघटनेचे सुनील पार्टे, उपाध्यक्ष चंद्रकांत कासुर्डे, महाबळेश्वर टुरिस्ट टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष संदीप अक्षंतल व पाचगणीचे अध्यक्ष चंद्रकांत मर्ढेकर, सुधाकर हिरवे, शंकर ढेबे, शंकर जाधव, बाळू कदम, दत्तात्रय जाधव, विजय डांगे, दादा मानकर, जावेद वारूणकर आदी उपस्थित होते.वाहतुकीची कोंडी, पर्यटकांची गैरसोयया आंदोलनामुळे शहर व परिसरातील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. बंदमुळे शहरातील पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. अनेक पर्यटकांनी पाचगणी गाठली व आपली सोय केली.