शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

गावाच्या विकासासाठी नोकरदार सरसावले

By admin | Updated: November 15, 2016 01:01 IST

युवा मंचची स्थापना : कोपर्डे हवेलीत विविध उपक्रमांना प्रारंभ- गूड न्यूज

कोपर्डे हवेली : परगावी नोकरीसाठी असणाऱ्या युवकांनी सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी कोपर्डे हवेली येथे ‘युवा मंच’ची स्थापना केली आहे. येथील युवक नोकरीसाठी विविध ठिकाणी आहेत. मात्र, आपण या मातीचे देणे लागतो याची जाणीव होऊन गावात सामाजिक उपक्रम राबवण्याबरोबर गावाच्या विकासासाठी ‘युवा मंच’ची स्थापना करण्यात आली आहे.कोपर्डे हवेली गावातील तरुण नोकरीनिमित्त संपूर्ण राज्यासह देशातील इतर ठिकाणी कार्यरत आहेत. दिवाळी, यात्रा यावेळी ते गावी येत असतात. त्यावेळी त्यांच्यात चर्चा होऊन गावात सामाजिक उपक्रम राबवण्याचे ठरले. त्यातून त्यांनी ‘कोपर्डे हवेली युवा मंच’ची स्थापना केली. त्यामध्ये त्यांनी नियमावली तयार केली.राजकारण विरहित काम करणे, कोणत्याही पदाची निर्मिती न करणे, बैठकीवेळी खुर्चीवर छत्रपती शिवरायांची मूर्ती ठेवून चर्चेला सुरुवात करणे तसेच सामाजिक उपक्रम राबवताना स्वच्छतेला जास्त महत्त्व देणे, तरुणांना नोकरीसंदर्भात मार्गदर्शन करणे, गाव प्लास्टिकमुक्त करणे, नोकरीसाठी पुण्यामध्ये तरुण आले तर नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय मोफत करणे, विधायक काम करण्यासाठी ग्रामपंचायतीला प्रवृत्त करणे तसेच राष्ट्रीय कार्यक्रमावेळी मदत करणे, लष्कराविषयी प्रेम जागृत करणे, गावात स्वच्छता राहण्यासाठी दररोज घंटागाडी फिरवण्यासाठी ग्रामपंचायतीला प्रवृत्त करणे, लहान मुलांसाठी उपक्रम राबवणे आदी कामे युवा मंच करणार आहे. त्यामध्ये प्लास्टिक टाळण्यासाठी प्रबोधनात्मक डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून चार ठिकाणी नोकरीसंदर्भातील माहिती पुरविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही जबाबदारी ग्रामपंचायतीसह इतर संस्थांना देण्यात आली आहे. इतर खर्चासाठी मंचच्या सभासदांच्यावर मासिक वर्गणी ठरवण्यात आली आहे. जे सभासद नोकरीत कायम आहेत तेच वर्गणी देणार आहेत. सध्या इतर ठिकाणच्या तुलनेत पुण्यामध्ये असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या युवा मंचमध्ये दोनशेच्यावर युवक सामील झाले आहेत. अजूनही युवक सहभागी होण्याची चिन्हे आहेत. ‘गावच्या विकासासाठी स्वत: एक पाऊल उचलूया पुढे’ हे या मंचचे ब्रीद वाक्य आहे. (वार्ताहर)