शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

जवानांच्या लक्षवेधी कसरतींचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:35 IST

कºहाड : मराठी संस्कृतीचे प्रदर्शन, पोलीस तसेच लष्करी शिस्तीचे दर्शन, डेअरडेव्हिल्सच्या बायकर्सचे काळजाचा ठोका चुकवणारे स्टंट आणि स्किर्इंग, एरो ...

कºहाड : मराठी संस्कृतीचे प्रदर्शन, पोलीस तसेच लष्करी शिस्तीचे दर्शन, डेअरडेव्हिल्सच्या बायकर्सचे काळजाचा ठोका चुकवणारे स्टंट आणि स्किर्इंग, एरो मॉडेलिंगच्या कसरतींनी रविवारी कºहाडमध्ये विजय दिवस साजरा करण्यात आला.छत्रपती शिवाजी स्टेडियमवर साजरा करण्यात आलेल्या एकविसाव्या विजय दिवस सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या सुमारे पंधरा हजार नागरिकांना विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळाली. चार वर्षांच्या कालावधीनंतर बेंगलोरच्या इंडियन आर्मी डेअरडेव्हिल्स दुचाकीस्वारांनी सादर केलेले अविश्वसनीय स्टंट्स, तब्बल ३ हजार फूट उंचीवरून मारलेली पॅराशूट जम्प, संतोष जाधव यांनी दाखवलेले रिव्हर्स रिक्षा चालवण्याचे अविश्वसनीय कौशल्य समारोहाचे आकर्षण ठरले.भारतीय सैन्यदलाच्या बांगला मुक्ती संग्रामातील विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ विजय दिवस समारोह समितीच्या वतीने विजय दिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. विजय दिवस ज्योतीचे प्रज्वलन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, विजय दिवस समारोह समितीचे प्रमुख कर्नल संभाजी पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. खेळाडूंनी आणलेल्या विजय दिवस ज्योतीने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या ज्योतीपाठोपाठ पारंपरिक वेशभूषेतील बाईक रॅलीतील महिला दाखल झाल्या. या रॅलीत शंभरहून अधिक दुचाकीस्वार महिला सहभागी झाल्या होत्या. त्यापाठोपाठ पोलीस, एनसीसी, सीआरपीएफ, कºहाड शहर पोलीस ठाण्याचे निर्भया पथक, बँड पथके यांनी प्रमुख पाहुण्यांना संचलनाने मानवंदना दिली.प्रारंभी मीनल ढापरे यांनी नृत्य दिग्दर्शन केलेले विठ्ठल गीत सादर करण्यात आले. आष्ट्याच्या महात्मा गांधी विद्यार्थ्यांनी केवळ शिट्टीच्या आवाजावर नियंत्रित केली जाणारी कंटिन्युटी व्हिसल ड्रील सादर केली. बॉम्बे सॅफर्स क्लबच्या जिम्नॅस्टिकपटूंनी अतिशय नेत्रदीपक जिम्नॅस्टिक प्रात्याक्षिके दाखवली. करवडी येथील एंजल्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी झांजपथक वादन सादर केले.आॅटो रिक्षासारख्या वाहनातूनही स्टंट करता येतात, याचा साक्षात्कार संतोष जाधव यांनी करून दिला. जाधव यांनी गतीने रिक्षा रिव्हर्स गिअरमध्ये चालवणे तसेच बाजूच्या आणि मागील दोन चाकांवर उभी करणे यासारखे अविश्वसनीय स्टंट दाखवले. पेठ वडगाव येथील गुरुकुल अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर स्किर्इंग म्हणजेच दोरीवरील उड्या तसेच दांडपट्ट्याचे प्रात्याधिक सादर करून उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले. शेकडो फूट उंचीवरून स्टेडियमवर उतरलेल्या तीन पॅरामोटर्सधारकांनी आपल्या अप्रतिम कौशल्याने सर्वांची मने जिंकली.रविवारचा दिवस असल्यामुळे विजय दिवस सोहळ्यासाठी शहरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने आले होते. त्यामुळे दुपारी दोन वाजल्यानंतर शिवाजी स्टेडियमवर नागरीकांनी गर्दी केली होती.मल्लखांब, कुकरी डान्सबेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी मल्लखांबाचे १२ प्रकार सादर केले. याच सैन्य दलाच्या तुकडीने मराठमोळा खेळ असणाºया झांजपथक आणि लेझीम खेळाची प्रात्याक्षिकेही दाखवली. गुरखा रेजिमेंटच्या जवानांनी पारंपरिक नेपाळी नृत्य असणाºया कुकरी डान्सचे प्रात्याक्षिक दाखवले. आर्मी डॉग पथकामधील देखण्या श्वानांनी आपल्या ट्रेनरच्या सूचनेनुसार विविध कवायती सादर करून आपल्या स्वामी निष्ठेबरोबरच कौशल्याचेही प्रदर्शन घडवले.