शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जावयाने चुकविला सासऱ्याच्या पिस्तूलाचा नेम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जाती - पातीच्या भिंती मोडून आंतरजातीय विवाहासाठी शासन प्रयत्न करत असलं तरी समाजानं आजही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जाती - पातीच्या भिंती मोडून आंतरजातीय विवाहासाठी शासन प्रयत्न करत असलं तरी समाजानं आजही अशा विवाहाला दुय्यमस्थानी ठेवलंय. हे सिद्ध करणारी घटना साताऱ्यात नुकतीच समोर आलीय.

मुलीनं आंतरजातीय विवाह करून तब्बल १९ वर्षे उलटली. तरी वडिलांच्या मनातील राग किंचितही कमी झाला नाही. याच रागातून निवृत्त अधिकारी असलेल्या सासऱ्याने चक्क जावयाच्या कानाला पिस्तूल लावले. मात्र, प्रसंगावधान राखून जावयाने त्यांचा हात पकडल्याने अनर्थ टळला. अन्यथा क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं.

साताऱ्याचे उपनगर असलेल्या संगममाहुलीजवळील राजनगरमध्ये ही खळबळजनक घटना घडलीय.

धन्यकुमार माने यांनी तब्बल १९ वर्षांपूर्वी आंतरजातीय लग्न केलंय. त्यांना १८ वर्षांची एक मुलगी व एक मुलगा आहे. एकंदरीत गुण्यागोविदाने त्यांचा संसार सुरू आहे. कृष्णानगर येथे माने यांचे सासरे रमेश ससाणे (वय ६६) हे वास्तव्यास आहेत. ससाणे हे उत्पादन शुल्कमधील निवृत्त अधिकारी आहेत. आजोळ जवळच असल्याने माने यांची दोन्ही मुले रविवार, दि. २९ रोजी ससाणे यांच्या घरी गेली होती. या मुलांना रात्री घरी येण्यास उशिर झाल्याने धन्यकुमार माने हे त्यांना आणण्यासाठी गेले. मुलांचे आवरेपर्यंत माने हे हाॅलमध्ये थांबले होते. त्यावेळी रमेश ससाणे म्हणाले, तु माझ्या मुलीसोबत इंटरकास्ट लव्हमॅरेज केलेस. तुमच्यामुळे आमची अब्रू गेली आहे. त्यावर माने हे त्यांना समजावून सांगत होते. शाब्दिक वाद वाढू लागल्यानंतर माने यांनी पत्नीला फोन करून बोलावून घेतले. त्यांची पत्नीही तेथे तत्काळ आली. त्यांची मुलगी त्यांना म्हणाली, आमच्या लग्नाला आता १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीदेखील तुम्ही वाद का घालताय. असं म्हणताच रमेश ससाणे हे आतील खोलीत गेले. आतून पिस्तूल घेऊन बाहेर आले. आज तुम्हाला संपवतोच, दाखवतो मी काय आहे ते. असं म्हणून धन्यकुमार माने यांच्या कानाच्या मागे पिस्तूल लावले. परंतु प्रसंगावधान राखून माने यांनी ससाणेंचा हात धरला. त्यामुळे अनर्थ टळला. अन्यथा मोठा अनुचित प्रकार घडला असता.

चाैकट : आजोबाच्या ‘कर्तृत्त्वा’चे नातीने केले शूटिंग...

आजोबा रमेश ससाणे यांनी हातातील पिस्तूल वडिलांवर रोखल्याचे दिसताच नातीने हातचलाखी करून व्हिडिओ शुटिंग सुरू केलं. २१ सेकंदाचे शूटिंग झाल्यानंतर ससाणेंच्या हा प्रकार लक्षात आला. व्हिडिओ शूटिंग करू नको, असं त्यानं नातीला धमकावलं. तरीही नात ऐकत नसल्याचे पाहून त्याने हातातील पिस्तूल चक्क नातीच्या अंगावर फेकून मारलं. पण, नातीने केलेल्या २१ सेकंदाच्या शूटिंगमध्ये आजोबाचं खरं कर्तृत्त्व मात्र समोर आलं.