शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वृत्ती बदलण्यास परमार्थ समजणे योग्य

By admin | Updated: January 23, 2015 00:39 IST

चिन्मय महाराज : महोत्सवातील चौथ्या पुष्पात कीर्तनाने भाविक भारावले

कऱ्हाड : ‘जग समजून घेताना माणसाने अगोदर स्वत:ला समजून घेतले पाहिजे, त्यासाठी स्वत:ची वृत्तीे बदलणे गरजेचे आहे़ परमार्थाच्या नामस्मरणाबरोबरच ज्ञानेश्वरीचा अर्थाऐवजी त्यातील भाव समजून घ्या,’ असे विवेचन चिन्मय महाराज यांनी यशवंत महोत्सवाच्या चौथ्या पुष्पात बुधवारी उपस्थित भाविकांना पटवून सांगितले.यशवंत को-आॅप. बँकेच्या वतीने आयोजित पाचव्या कीर्तन महोत्सवात चौथ्या दिवशीच्या पुष्पात त्यांनी सुश्राव्य कीर्तन केले. या कीर्तनास भगवती महाराज उपस्थित होत्या.चिन्मय महाराजांनी आपल्या कीर्तनातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सांप्रदायामध्ये किती ताकद आहे़ याविषयी उदाहरणासह आपल्या अभंगातून समजावून सांगितली़ ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगातून संताना एकत्र करून सांप्रदाय स्थापन केला़ तसेच ज्ञानेश्वरीतून सांप्रदायाचे महत्त्व काय, हे साऱ्या जगासमोर मांडले.’‘भिती संपली, आता नाही राहिला दुरावा’, ‘असा भाव समजुनी, तुम्ही-आम्ही घ्यावा!’ भीती असते तेव्हा दुरावा असतो, जेव्हा भीती संपते, तेव्हा दुरावाही संपतो़ त्यामुळे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भाविकांशी त्यांचा असलेला दुरावा दूर केला आहे. एका अंधाला ज्ञानेश्वरी वाचावयाची होती तेव्हा त्याने ज्ञानेश्वरीचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्या हाताच्या बोटांच्या साहाय्याने त्या ज्ञानेश्वरीला स्पर्श करून त्यातील अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यावेळी त्याला तो अर्थ उमगला नाही. ज्यावेळी त्या अंधाने ज्ञानेश्वरीतील भाव समजून घेतला तेव्हा ज्ञानेश्वरी त्याच्या तोंडपाठ झाली.’अशा उदाहरणांच्या साहाय्याने चिन्मय महाराजांनी उपस्थितांना ज्ञानेश्वरीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. (प्रतिनिधी)