शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

प्रथमच घडलं; जिल्ह्यातील टँकर मे महिन्यातच बंद, जिल्ह्यात वळीव धुवाॅंधार : टंचाई संपली; ८० गावे अन् ४५० वाड्या होत्या तहानलेल्या

By नितीन काळेल | Updated: May 29, 2025 20:39 IST

सातारा जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर दरम्यान पाऊस पडतो. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहते. पण, जावळी, वाई, महाबळेश्वर, पाटण आणि कऱ्हाड तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते.

नितीन काळेल 

सातारा : जिल्ह्यात दरवर्षीच जानेवारी ते जून महिन्या दरम्यान टंचाई असतेच. त्यामुळे लोकांना आणि जनावरांनाही टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यावर्षीही मे महिन्याच्या मध्यापर्यंत ८० गावे आणि ४५० वाड्यांच्या घशाला कोरड पडलेली. पण, वळवाचा पाऊस धुवाॅंधार पडल्याने जिल्ह्यातील सर्वच टॅंकर मे महिन्यातच बंद झालेत. इतिहासात प्रथमच असे घडले आहे.

सातारा जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर दरम्यान पाऊस पडतो. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहते. पण, जावळी, वाई, महाबळेश्वर, पाटण आणि कऱ्हाड तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते. तरीही दरवर्षी जानेवारी महिन्यानंतर जिल्ह्यात टंचाई वाढते. त्यामुळे माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांतील टंचाई निवारणासाठी पाऊस पडेपर्यंत म्हणजे जून महिन्यातही टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. तर जादा पाऊस पडणाऱ्या तालुक्यांतही टंचाई जाणवते. गेल्यावर्षी तर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १२५ टक्क्यांहून अधिक पर्जन्यमान झालेले. तरीही जिल्ह्यातील टंचाईला लवकर सुरूवात झाली. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच टॅंकरने लोकांना पाणीपुरवठा सुरू झालेला. मात्र, आता हे चित्र बदलेले आहे. मागील १० दिवसांत वळवाचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे जिल्ह्यातील टॅंकर पूर्णपणे बंद झाले आहेत.

माणमध्ये ४९ गावे ३५७ वाड्यांना कोरड..

माण तालुक्यात सर्वाधिक टंचाई होती. माणमधील ४९ गावे आणि ३५७ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. ५२ टॅंकरवरती ७१ हजार नागरिक आणि ५४ हजार पशुधनाची तहान अवलंबून होती. सध्या माण तालुक्यातच पावसाने उन्हाळ्यातच विक्रमी हजेरी लावली. त्यामुळे उन्हाळ्यातच माणमधील टॅंकर बंद झाला. हा एक इतिहास घडला आहे.वाई, पाटण, खटाव, फलटण तालुक्यातील टंचाई संपली...

जिल्ह्यातील माणबरोबरच पाटण, वाई, कोरेगाव, खटाव, फलटण तालुक्यांत टॅंकर सुरू झाले होते. एकूण ८० गावे आणि ४५० वाड्यांतील १ लाख ६ हजार नागरिक आणि ६८ हजार पशुधनाला टॅंकरच्या पाण्याचा पुरवठा होत होता. पाटण तालुक्यात एक गाव आणि चार वाड्यांना टॅंकर सुरू होता. तर वाईत चार गावे आणि तीन वाड्या, कोरेगावमध्ये सात गावे, खटाव तालुक्यात १८ गावे आणि ८१ वाड्या, फलटणला एक गाव आणि पाच वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता.

७८ टँकर बंद...

जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यापर्यंत ७८ टॅंकर टंचाई निवारणासाठी धावत होते. यामधील शासकीय ५ तर खासगी ७५ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. पण, आता हे सर्व टॅंकर बंद झाले आहेत.