शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

ऐन आचारसंहितेत घेतल्या मुलाखती

By admin | Updated: November 5, 2014 00:05 IST

भरतीवरच प्रश्नचिन्ह : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील ९१ उमेदवारांच्या सरकारी नोकरीचे स्वप्न भंगले

जगदीश कोष्टी - सातारा -राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत भरती झालेल्या ९१ कर्मचाऱ्यांना फुकट राबविल्याने संताप व्यक्त होत असतानाच सरकारी कार्यालयात काम करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या ९१ कर्मचाऱ्यांची भरतीच मुळात ऐन आचारसंहितेच्या काळात केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही भरतीच बेकायदा असल्याची खळबळजनक माहिती समोर येऊ लागली आहे.आरोग्य सेवा संचालनालयातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २,२९८ अकाउंन्टंट कम डाटा एन्टी आॅपरेटरची (लिपिक) भरती करण्याचा ठेका मुंबई येथील ईगल सिक्युरिटी अ‍ॅण्ड पर्सनल सर्व्हिसेसला दिला होता. त्यानुसार फेबु्रवारी, २०१४ पासून कर्मचार पुरवठा करण्यास सुरुवातही झाली.कर्मचाऱ्यांची भरती भलेही खासगी कंपनी करणार असली तरी ते कर्मचारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात काम करणार होते. त्यामुळे या पदांची भरतीही पारदर्शीपणे व शासकीय नियमांचे पालन करतच होणे आवश्यक होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ५ मार्चपासून लागू झाली होती. आचारसंहितेच्या काळात शासकीय नोकरीभरती प्रक्रिया स्थगित असते. मात्र, आचारसंहिता लागल्यानंतर लगेच चार दिवसांत या मुलाखती घेण्यात आल्या. ९ , १० मार्च रोजी या पदासाठी मुलाखती झाल्या. या मुलाखती घेताना कोणताही शासकीय अधिकारी उपस्थित नव्हता हे विशेष. वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन थेट मुलाखतीसाठी बोलाविले होते. त्याठिकाणी दोन दिवस मुलाखती घेतल्यानंतर निवड झालेल्या कर्मचाऱ्यांकडून कंपनीनेच २,१०० रुपये घेऊन त्यांना हजर होण्याचे पत्र दिले होते. त्या पत्रावर तारीख न देता पत्र मिळाल्यापासून पंधरा दिवसांत हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नेमून दिलेल्या ठिकाणी उमेदवार हजरही झाले. तेही चक्क आचारसंहितेतच. त्यांची नेमणूक सहा महिन्यांसाठी केली होती. ही मुदतही संपली आहे. तरीही त्यांना अद्याप पगार मिळालेला नाही.‘लोकमत’ने फोडली होती वाचाप्राथमिक आरोग्य केंद्रात अकाउन्टंट कम डाटा एन्ट्री आॅपरेटरपदी कार्यरत असलेल्या ९१ कर्मचाऱ्याचे पगार झालेले नाही. यासंदर्भात ‘लोकमत’ने २१ सप्टेंबर रोजी ‘आरोग्य विभागातील कर्मचारी बिनपगारी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याद्वारे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याने भरडले गेलेले कर्मचारी एकत्र आले. त्यांनी वेळोवेळी विविध पातळ्यांवर पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. ंसरकारी नोकरीसाठी हॉटेलात मुलाखतीईगल ही खासगी कंपनी भरती करुन घेणार असली तरी भरती होणारे कर्मचारी सरकारी कार्यालयात काम करणार होते. या भरतीकडे पाहताना प्रत्येक उमेदवार हा ‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान’ची भरती म्हणून पाहत होता. सरकारी भरतीप्रक्रिया कोणत्याही खासगी जागेत होत नाही. मात्र, ही भरती सातारा शहरातील दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ८ व ९ मार्च रोजी करण्यात आली.संबंधित कंपनीने यासंदर्भात शासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याची विनंती केल्याचे समजते. मात्र, आचारसंहिता लागू होती. त्यामुळे शासकीय इमारत व अधिकारीही मदतीला आले नव्हते.