सातारा : प्रत्येक माणसाला कोणता तरी छंद असतोच. कुणी उत्तम चित्रे रेखाटतो, कुणी मातीची खेळणी करतो तर कुणी कविता तोंडपाठ करतो. बालपणी खेळण्या हुंदडण्याच्या वयात एका मुलाला आगळ्यावेगळ्या छंदाने पछाडलेले. तो छंद म्हणजे विविध देशांची दुर्मिळ नाणी गोळा करणे आणि तो छंदवेडा मुलगा म्हणजे रविकांत महामूलकर. घरची परिस्थिती गरिबीची असली तरी रविकांतकडे विविध देशांच्या नाण्यांचा खजिना आहे.रविकांत हा लहानपणापासूनच जावळी तालुक्यातील भिवडी या मामाच्या गावाला शाळेसाठी राहिलेला. चौथीत असताना मधल्या सुटीत मुलं मैदानावर खेळायची. बागडाची. पण, रविकांत थेट वाण्याचं दुकान गाठायचा. दुकानदारांकडे विचारपूस करून त्यांच्याकडून गल्ल्यातून जुनी नाणी घ्यायचा. सुटीच्या दिवशी तर आपल्या मित्रांबरोबर खेळायचे सोडून तो गावातील आजी-आजोबांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याकडे जुन्या नाण्यांबद्दल बोलायचा. जुन्या माणसांकडून तो त्यांच्या काळातील नाणी गोळा करायचा. सुमारे वीस वर्षांपासून रविकांतनं हा आगळावेगळा छंद जोपासला असून, आज त्याच्या खजिन्यात अनेक देशांच्या विविध नाण्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)असा आहे नाण्यांचा खजिनाभारतीय एक पैसा, दोन पैसे, पाच पैसे, १८३५, १८७८, १९१२ मधील ब्रिटिशकालीन पितळ व जर्मन धातूची अनेक नाणी आहेत. चीनचे मधोमध छिद्र असलेले ५० पैसे, सिंगापूरचे फाईव्ह सेन्टस्, अमेरिकेचे वन डाइम, हाँगकाँगचे टष्ट्वेंटी सेन्टस् आहे.राम-सीता-लक्ष्मण अन् हनुमानाची मुद्रारविकांतच्या खजिन्यात एका पितळेच्या नाण्यावर राम-सीता-लक्ष्मण अन् त्यांच्या पायाशी बसलेले हनुमान असे चित्र आहे. संस्कृत लिपीतील एक संदेशही त्यावर लिहिलेला आहे. त्याच्या वडिलांना ते नाणे सापडले होते. ते त्यांनी मुलाच्या खजिन्यात जमा केले. मात्र, कोणत्या काळातील हे नाणी आहे, याबाबत त्यांना काहीच माहिती नाही.
दुर्मिळ नाणी जमविण्याचा छंद !
By admin | Updated: November 23, 2014 23:48 IST