शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन घटल्याने फुलांच्या दरात वाढ

By admin | Updated: December 23, 2014 23:51 IST

विक्रेते, उत्पादकांचा फायदा : नाताळ, नवीन वर्षामुळे फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी

मिरज : थंडीमुळे फुलांच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारात फुलांचे दर वाढले आहेत. मार्गशीर्ष महिना, लग्नसराई, ख्रिसमस, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर फुलांना मागणी असल्याने दरात ५० टक्के वाढ झाली आहे. फु लांचा दर तेजीत असल्याने व्यापाऱ्यांसह उत्पादकांचा फायदा झाला आहे. मिरज पूर्व भागात मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन होते. गणेशोत्सवापासून फुलांचे दर तेजीत आहेत. मिरजेत दररोज सकाळी भरणाऱ्या फुलांच्या एकमेव बाजारात खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल सुरू आहे. थंडीमुळे निशिगंध, लिली, गुलाबाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने या फुलांची बाजारात टंचाई असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. थंडीमुळे फुलांचे उत्पादन कमी झाल्याने दर वाढला आहे. फुलांना जोरदार मागणी आहे. मात्र निशिगंध, झेंडू, गलांडा, लिली, गुलाब यासह डच गुलाब, जर्बेरा आदी हरितगृहातील विदेशी फुलांचीही आवक घटली आहे. जिल्ह्यातील तासगाव येथून गुलाब, कर्नाटकातून झेंडू, आष्टा येथून निशिगंधाची फुले, शिरोळ तालुक्यातून फ्रेंच गुलाब, जर्बेरा व ग्लॅडोची फुले विक्रीसाठी येतात. मार्गशीर्ष महिना, लग्नाचा हंगाम, ख्रिसमस, तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फुलांची मागणी असल्याने मिरजेच्या फुलांच्या बाजारात खरेदीसाठी व्यापाऱ्यांची गर्दी आहे. संक्रांतीपर्यंत फुलांचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर व्हॅलेंटाईन डेसाठी गुलाब, डच गुलाबास मोठ्याप्रमाणात मागणी राहणार आहे. मिरजेतून मुंबईला मोठ्याप्रमाणात गुलाबाची निर्यात करण्यात येते. शिरोळ तालुक्यात हरितगृहात उत्पादन होणाऱ्या फ्रेंच गुलाब, जर्बेरा व ग्लॅडो आदी फुलांची मिरजेतून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह, कोकणातील सावंतवाडी, कणकवली, गोव्यातील पणजी, कर्नाटकातील विजापूर व कागवाड येथे मोठ्या प्रमाणात निर्यात होते. फुलांच्या दरवाढीमुळे व्यापारी व फू ल उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. फुले महागल्याने हारांच्या दरातही वाढ झाली आहे. किमान ५० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत फुलांच्या हारांची किंमत आहे. (वार्ताहर)मिरजेतील फुलांचे दर निशिगंध - १५० रुपये किलो झेंडू - ६० रुपये गलांडा - ५० रुपये किलोगुलाब - ३०० रुपये शेकडाजर्बेरा - १० फुलांची पेंडी ३० रुपयेफ्रेंच गुलाब - २० फुलांची पेंडी १५० रुपये