शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील चाचणी लॅबची क्षमता वाढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग असलेले रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जे निर्बंध लावले आहेत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग असलेले रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जे निर्बंध लावले आहेत ते अधिक कडक करावेत. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढवून कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढवा, अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज कोरोना संसर्ग आढावा बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी ते बोलत होते. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी उपस्थित होते.

तरुणांना जास्त प्रमाणात कोरोना संसर्ग होत आहे. जिल्ह्यातील तरुणांनी शासनाने तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, जो कोणी नियमांचे पालन करणार नाही अशांवर कारवाई करावी. रुग्णांची संख्या वाढत आहे. कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही तसेच रुग्णास सहजपणे बेड उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.

कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे जास्तीतजास्त कोरोना टेस्टिंग करावे, अशा सचूना करून पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, शासनाने व प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. मास्क घालणार नाहीत अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच लग्न समारंभावर लक्ष ठेवावे. रात्री ८ नंतर ५ पेक्षा अधिक नागरिक एकत्र येणार नाहीत याचीही दक्षता पोलिसांनी घ्यावी.

लग्न समारंभ, बार, रेस्टॉरंट या ठिकाणी पोलीस विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. ज्या ठिकाणी नियमांचे पालन होणार नाही तेथे तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री देसाई यांनी या बैठकीत सांगितले.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढविण्यासाठीचा प्रस्ताव द्यावा, या लॅबसाठी केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी या बैठकीत सांगितले.

या वेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण यांनी उपयुक्त अशा सूचना केल्या. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.