शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वापराशिवाय खाद्यपदार्थ करणेच अशक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:42 IST

सातारा : वापर केलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे हा गुन्हा आहे. मात्र, एकदा वापरलेले तेल फेकून दिल्यानंतर पदार्थ बनविण्याचा ...

सातारा : वापर केलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे हा गुन्हा आहे. मात्र, एकदा वापरलेले तेल फेकून दिल्यानंतर पदार्थ बनविण्याचा खर्चाचा आकडा वाढेल जो सामान्यांना न परवडणारा असेल. त्यामुळे हातगाड्यासह हॉटेलमध्येही या तेलाचा सर्रास वापर केला जातो. वापरलेल्या तेलातून निघणारे ट्रान्स फॅट हृदयासाठी घातक आहेत.

बहुतांश हॉटेल, रेस्टॉरंट, स्नॅक्स सेंटरमध्ये खाद्यपदार्थ तळण्यासाठी एकदा तेल टाकल्यानंतर त्याच तेलात वेगवेगळे पदार्थ तळतात. वास्तविक, पाहता प्रत्येक पदार्थांसाठी वेगळं तेल वापरणे आवश्यक आहे; पण ते परवडत नसल्याने तेलाचा पुनर्वापर होत आहे. लोकही विचार न करता स्वादिष्ट अन् चविष्ट लागल्यावर पदार्थ आवडीने खातात. जिभेचे हे चोचले अवघ्या शरीराला त्रास देणारे आहेत.

वडे, भजी, पुऱ्या, समोसे, कचोरी असे पदार्थ वारंवार तळलेल्या तेलाचा वापर करून करतात. हेच पदार्थ आपण आवडीने खातो. अशा पुनर्वापर करून तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे घसा दुखणे, पोटाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार, कर्करोगासारखे आजारही बळावू शकतात.

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) तेलाचा पुनर्वापर वाढवतोय कॉलेस्ट्रॉल

(कोटला फोटो आहे)

तेलात फॅटी ॲसिड असतात. पुनर्वापर केलेल्या तेलाचे फॅटी ॲसिडचे रूपांतर ट्रान्स फॅट्समध्ये होते. हे ट्रान्स फॅटस कोलेस्ट्रॉल वाढवून हृदयावर परिणाम करतात. त्यामुळे बाहेर खाताना तळलेले पदार्थ टाळणे हा उत्तम पर्याय आहे. कार्यालयीन दौऱ्याच्या निमित्ताने बाहेर पडणं होत असेल तर घरात केलेला चिवडा, ड्रायफ्रुटस्, फळे हा आहार ठेवणं सर्वोत्तम.

- प्रीती रेवले, आहारतज्ज्ञ, सातारा

या पर्यायांचा विचार होणे आवश्यक आहे

नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने फिरण होत असल्याने अनेकांच्या खाण्याचा प्रश्न उद्भवतो. अशा वेळी घरून सुक अन्न नेणं उपयुक्त ठरते. यात पौष्टिक लाडू, भाजून केलेला चिवडा, भडंग, सुकामेवा हे सोबत ठेवणे उपयुक्त आहे. ज्याही ठिक़ाणी फिरताय तिथे स्थानिक फळांचा आस्वाद घेणंही आरोग्यदायी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. स्नॅकिंगची हौस भविष्यात अनेक आजारांचे निमित्त ठरू शकते याचे भान ठेवून अन्नाचे सेवन करावे असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.

२) रस्त्यावर न खाल्लेलेच बरे

बाहेर मिळणाऱ्या तळलेल्या पदार्थांचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. हातगाडीवर वडा तळणाऱ्या व्यावसायिकाला तेलाचे पुनर्वापर टाळणे केवळ अशक्य आहे. घरातही एकदा वापरलेले तेल कोणी टाकून देत नाही, त्यामुळे व्यावसायिक तर सर्रासपणे तेलाचा पुनर्वापर करतात. त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होणार असेल तर ते अन्नपदार्थ न खाणं हा उत्तम पर्याय आहे. अगदीच तळलेले पदार्थ खायचेच असतील तर मग रेडी टू फ्राय पदार्थ घरी आणावेत आणि ते घरात तळून खाणे हा एक पर्याय असू शकतो.