शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

अवैध दारू विक्री फोफावली... सुशिक्षित तरुणाई बिघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:34 IST

कातरखटाव : मार्च महिन्यापासून लॉकडाऊनचा फायदा घेत पडळ, कारखाना स्थळ, एनकूळ, बनपुरी, बोंबाळे या परिसरातील ...

कातरखटाव : मार्च महिन्यापासून लॉकडाऊनचा फायदा घेत पडळ, कारखाना स्थळ, एनकूळ, बनपुरी, बोंबाळे या परिसरातील खेड्यापाड्यात दारू व्यवसाय फोफावला आहे. चोरीचोरी-चुपकेचुपके कुठेही दारू मिळू लागल्यामुळे तरुणाई व्यसनाकडे वळत आहे. प्रशासनाने अवैध दारू विक्रेत्यांना लगाम घालण्याची मागणी होत आहे.

कोरोनाने वर्षभर गावोगावी पाय पसरले आहेत. यामुळे अर्थव्यवस्था कोलमडल्याने सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले. कातरखटावसह परिसरात तळीराम दारू विकून मोकळ्या बाटल्या राजरोसपणे कुठेही फेकत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून येत आहेत. वयोगट न पाहता तळीराम कुणालाही दारू विकू लागल्यामुळे ऐन तारुण्यात युवक अधिकच गुरफटू लागला आहे. यामुळे पैसे, वर्चस्वाचा वाद, राजकारणातून मारामारी, भाऊबंदकी, मौजमजेसाठी चोऱ्या केल्या जात आहेत. कमी वयात पैसा आल्यामुळे तरुणाई वाईट मार्गाकडे वळलेली दिसून येत आहे. निवडणुकीच्या काळात तरुण जास्त प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात आहेत. नंतर गरजा पूर्ण करण्यासाठी मटका किंवा अवैध मार्ग अवलंबताना दिसत आहेत.

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागल्यानंतर जनजीवन, आर्थिक घडी कोलमडली असताना, या काळात उद्योगधंदे बंद होते. त्यावेळी ग्रामीण भागात अवैधरित्या दारू विक्री वाढली. कमी वेळात दुप्पट पैसा मिळू लागल्यामुळे अनेक मद्यपींचे अड्डे माळरानात, शेतात सुरू झाले.

कोट

वाढत्या वयात व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे मुलांचे मार्ग बदलून जातात. प्रतिष्ठा ढासळल्यामुळे समाजात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यांच्याकडे सहजरित्या बोट दाखवले जाते. त्यामुळे बहुतेकवेळा सुधारण्याऐवजी गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका वाढतो.

- आनंदराव बागल,

ज्येष्ठ नागरिक, कातरखटाव

चौकट

मानसिक संतुलनावर परिणाम

शारीरिक, मानसिक संतुलन बिघडणे या दोन्हीवर परिणाम होऊन भवितव्य अंधारात राहणार आहे. या प्रवाहात गेल्यामुळे शिक्षणाची लिंक तुटत जाणार आहे. मुलांची पुढील शिक्षण घेण्याची इच्छा होत नाही. यातून बाहेर पडणे अवघड होत जाते.

- डॉ. एन. ए. मोहिते,

कातरखटाव

२०कातरखटाव

कातरखटाव परिसरातील शेतात, माळरानात, इतरत्र दारूच्या रिकाम्या बाटल्या फेकल्या जात आहेत. (छाया : विठ्ठल नलवडे)