शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या शूटिंगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:40 IST

सातारा : अलीकडे लग्न समारंभामध्ये आणि प्री वेडिंगसाठीही ड्रोनचा वापर होऊ लागला आहे. मात्र, अशाप्रकारे लग्न समारंभात ड्रोनचा वापर ...

सातारा : अलीकडे लग्न समारंभामध्ये आणि प्री वेडिंगसाठीही ड्रोनचा वापर होऊ लागला आहे. मात्र, अशाप्रकारे लग्न समारंभात ड्रोनचा वापर करायचा असेल तर पोलीस ठाण्याची परवानगी घ्यावी लागते. अन्यथा कारवाई होऊ शकते. त्यामुळे लग्नाच्या शूटिंगसाठी ड्रोन वापरणार असाल तर लग्न आयोजकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

लग्न समारंभामध्ये फोटो शूट करण्यासाठी अनेक पर्याय शोधले जातात. उंचावर उभे राहून फोटो काढून लग्न मंडपाची आणि तेथील झगमगटाची प्रचीती येण्यासाठी अशाप्रकारे फोटो शूट केले जात असत. मात्र, अलीकडे ड्रोनच्या साहाय्याने लग्न समारंभाचे फोटो शूट केले जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. प्री वेडिंग असो की लग्नातील सर्व फोटो असो, हे ड्रोनद्वारेच काढले जात आहेत. हे प्रमाण वाढले आहे. मात्र, ड्रोनचा वापर करायचा असेल तर पोलिसांची परवानगी घेणे गरजेचे असते. अनेकदा पोलिसांचा कागदोपत्री ससेमिरा चुकविण्यासाठी ड्रोनची परवानगी घेतली जात नाही. मात्र, हे लग्न आयोजक आणि संबंधित ड्रोनधारकांवर कारवाईतून बेतण्यासारखे आहे. त्यामुळे ड्रोनची परवानगी घेणे आवश्यकच आहे.

चाैकट : ड्रोन उडविण्यासाठी लायसन्स हवे!

ड्रोन उडविण्यासाठी आता लायसन्सची आवश्यकता असते.

दहशतवाद्यांनी या ड्रोनचा वापर केल्यापासून ड्रोन वापरण्यावर निर्बंध आले आहेत.

आपल्या परिसराची माहिती या ड्रोनद्वारे दहशतवादी मिळवू शकतात किंवा एखादा बाॅम्बहल्लाही होऊ शकतो. त्यामुळे ड्रोन उडविण्यासाठी लायसन्सची गरज आहे.

चाैकट : ड्रोन उडविण्याचे नियम

या नियमांनुसार, ड्रोनचं ५ प्रकारांत वर्गीकरण करण्यात आलंय. त्यानुसार वजन पाहून ड्रोन खरेदीचा निर्णय घ्या.

नॅनो ड्रोन २५० ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी वजन

मायक्रो ड्रोन २५० ग्रॅम ते २ किलोपर्यंतच वजन

लहान ड्रोन २ किलो ते २५ किलोपर्यंत वजन

मध्यम ड्रोन २५ किलो ते १५० किलोपर्यंत वजन

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. ड्रोनचा वापर करायचा असेल तर या नियमांची माहिती हवी आणि त्याप्रमाणे नोंदणी करायला हवी. नाही तर कारवाई होऊ शकते.

या नियमांनुसार, ड्रोनचं ५ प्रकारांत वर्गीकरण करण्यात आलंय. त्यानुसार वजन पाहून ड्रोन खरेदीचा निर्णय घ्या.

नॅनो सोडून इतर ड्रोन उडविण्यासाठी डीजीसीएची परवानगी आवश्यक असते.

दोनशे फुटांच्या वर मायक्रो ड्रोन उडविण्यासाठी स्थानिक पोलिसांची परवानगी आवश्यक असते.

विमानतळ, आंतरराष्ट्रीय सीमा, संवेदनशील ठिकाणांपासून ठराविक अंतरावर ड्रोन उडवू शकता. अनेक संवेदनशील ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यास बंदी आहे.