शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दोषी असेन तर जनतेसमोर शिक्षा घेईन...

By admin | Updated: January 13, 2017 22:30 IST

जयकुमार गोरे : विधान परिषदेतील पराभवामुळे रामराजेंंनीच कुभांड रचल्याचा केला आरोप

सातारा : ‘माझ्याविरोधात वैचारिक व राजकीय लढाई करण्याची ताकद राहिली नसल्यानेच रामराजेंनी माझ्याविरोधात कुभांड रचले आहे. सभापतिपदाचा गैरवापर करून यंत्रणेवरही दबाव आणला. माझ्याविरोधात फिर्याद देणाऱ्यांशी रामराजेंचा संपर्क होता. लढाई कंबरेखाली नेऊन रामराजेंनी मला डिवचले आहे. मी दोषी असेन तर जनतेसमोर जाऊन शिक्षा भोगीन, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत त्यांच्या विजारीच्या नाड्या सुटतील,’ अशी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली. आ. गोरे म्हणाले, ‘मी चुकीचे काहीच केलेले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेताना खात्री करायला हवी होती. मी व्यक्तिगत आयुष्यात चुकीचे वागलो नाही. माझ्याविरोधात फिर्याद देणाऱ्या महिलेला शरीरसुखाची मागणी करणारा ‘एसएमएस’ मी केलेला नाही. पोलिसांनीही ज्या मोबाईल नंबरवरून हा एसएमएस आला, तो शोधून काढण्याची तसदी घेतली नाही.’आपले राजकीय अस्तित्वच मान्य नसल्याने रामराजे आपल्यावर दात खावून आहेत. माण-खटावमधले अस्तित्व संपले. मी आमदार झालो. जिल्हा बँकेत संचालक म्हणून निवडून आलो. विधान परिषद निवडणुकीत तर राष्ट्रवादीचे प्राबल्य असताना मोठ्या फरकाने काँगे्रसला यश मिळाले. समोरासमोरच्या लढाईत मी कुठेच कमी पडत नाही. समोरून लढायला मी ऐकणार नाही, हे लक्षात घेऊन माझ्याविरोधात कुंभाड रचले गेले आहे. यात रामराजेंचा रोल मोठा आहे. मी जर खोटे आरोप करत असेन तर रामराजेंनी माझ्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करावा. माझ्याविरोधात रचलेले कुभांड आधीच रचले गेले असते तर विधान परिषद तरी वाचली असती. दरम्यान, ज्या अल्बममध्ये अश्लील फोटो असल्याचे पोलिस सांगत होते, तो अल्बम मी पाहिला. त्यात फोटोमध्ये पाठविणाऱ्याचे नाव नाही. सायबर एक्स्पर्ट त्यांचे काम यथोचितपणे केले. मी पण फिर्याद दाखल केली होती. माझ्याविरोधात फिर्याद देणाऱ्या संबंधित व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीने माझ्याकडे खंडणी मागितली होती. याचे पुरावे व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहेत. ३० दिवस होत आले तरी तो गुन्हा दाखल केला गेला नाही. नीतिमूल्यांचा ठेका मी काय एकट्यानेच घेतला नाही. माझ्या नावामागे मोठा इतिहास नाही. मी तो लिहायला घेतला. मात्र, त्यांच्यामागे मोठा इतिहास आहे. जो काय फरक पडायचाय तो त्यांनाच पडेल, असेही आ. गोरे म्हणाले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक भरती प्रक्रिया बेकायदा आहे, असेही गोरेंनी सांगितले. (प्रतिनिधी) विधान परिषदेच्या निकालापासून प्रक्रिया सुरू विधान परिषदेत राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतर रामराजे हे फिर्यादी तसेच प्रदीप जाधव, विवेकानंद सावंत, शेखर गोरे यांच्या संपर्कात होते, हे कॉल डिटेल्सवरून लक्षात येते. प्रदीप जाधव हा खंडणी मागण्यासाठी फिर्यादीच्या वतीने माझ्याकडे आला होता. इंटरनेट पॅक मारायला पैसे नसणाऱ्याकडे २५ लाखांची रक्कम आली कुठून? प्रदीप जाधव असा कोण महान व्यक्ती आहे, ज्याला रामराजे १९ वेळा फोन करतात, असा सवालही गोरेंनी उपस्थित केला.जयकुमारला गोळी घालणेच तेवढे राहिलेयमाझ्यासमोर जनतेच्या मैदानात लढणे शक्य नसल्याने कंबरेखाली वार सुरू केले आहेत. त्यातूनही मी तावून-सुलाखून निघणार आहे. त्यामुळे मला आता केवळ गोळी घालणे, तेवढेच बाकी ठेवले आहे, असेही गोरे यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.रामराजेच राष्ट्रवादीचा ऱ्हास करणार...रामराजे नाईक-निंबाळकर स्वत:च यशवंतराव चव्हाणांची नीतिमूल्ये धुळीला मिळवून राष्ट्रवादीचा कारभार हाकत आहेत. माझ्याविरोधात कुभांड रचताना त्यांच्या पक्षातील आमदारांनीही विरोध केला. पण रामराजेंनी हट्टाने ते रचले रामराजेच राष्ट्रवादीचा ऱ्हास करतील, असे भविष्य आ. गोरेंनी वर्तविले. चक्रव्युहातून बाहेर पडून जयकुमार साधणार जनतेशी संवाद !म्हसवड : ‘खोटे गुन्हे दाखल करून आमदार जयकुमार गोरे यांना ऐन निवडणुकीत विनाकारण अडकविण्याचा विरोधकांचा बेत आम्ही हाणून पाडत आहोत. अटक होऊन जामीनही मिळाल्यानंतर थेट जनतेशी संवाद साधण्यासाठी रविवार, दि. १५ रोजी दुपारी चार वाजता दहिवडीतील बाजार पटांगणावर आमदार गोरे यांची जाहीर सभा होणार आहे,’ अशी माहिती बाजार समितीचे सभापती अरुण गोरे यांनी दिली. सभापती गोरे म्हणाले, ‘पुढील महिन्यात पार पडणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच आ. गोरे यांच्या अटक व जामीन प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगरपंचायत निवडणुकीपासून याप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आ. गोरेंना एका प्रकरणात नुकताच जामीन मंजूर झाला आहे. आ. गोरे आणि राष्ट्रवादीतील उभा संघर्ष संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. राष्ट्रवादीने आ. गोरेंना कात्रीत पकडण्याची एकही संधी आजपर्यंत सोडलेली नाही. त्यामुळे दहिवडीत होणाऱ्या या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.’