शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आईशप्पथ.. यापुढे मी शिवी देणार नाही !

By admin | Updated: January 1, 2015 00:16 IST

महिलांचा करूया आदर : नव्या वर्षात जीभ ‘वळणदार’ करण्याचा अनेक पुरूषांचा निर्धार

प्रगती जाधव-पाटील - सातारा  -समोरच्याच्या मनाला लागेल अशा शब्दांत त्यांच्या पर्यंत संताप पोहोचविण्याचा राजमार्ग म्हणजे शिवी! यातील दुर्दैव हे की राग स्त्रीचा असो वा पुरूषाचा शिव्या दिल्या जातात त्या स्त्रियांच्या अवयवांवरून. नवे वर्ष साजरे करताना महिलांचा सन्मान राखण्याचा संकल्प यावर्षी करूया!मातृसत्ताक व्यवस्थेत राहूनही महिलांविषयक आदर अभावानेच पहायला मिळतो. काहीही झाले तरी आयला मायला करत अपशब्द वापरणाऱ्यांना यात पुरूषार्थ वाटतो. या नव्या वर्षात तोंडावर नियंत्रण आणून शिव्या न देण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे. कित्येकदा आपली मैत्री पक्की आहे हे सांगण्यासाठी आपण आईचा भयंकर वाईट अर्थाने उध्दार करतो! काय मिळते पुरूषांना असे बोलून असा प्रश्न अनेकदा महिलांना पडतो. पण असे घाणेरडे शब्द उच्चारून आपणही काही वाईट बोलणे ऐकण्यापेक्षा महिला शांत राहणं पसंत करतात. पण आपल्या घरातील पुरूष महिलांविषयी इतक्या वाईट थराला जावून बोलू शकतो यामुळे महिला प्रचंड दहशतीखाली असतात. पाश्चात्य संस्कृती आपल्याकडे लगेच आत्मसात केल्या जातात. पण इंग्रजीत असणाऱ्या शिव्या कुठेही महिलांवर घसरत नाहीत. खेदाने नमुद करावेसे वाटते की सर्वाधिक निच्चस्तरीय शिव्या मोठ्या प्रमाणावर मराठी भाषेत दिल्या जातात. चला... किमान या नव्या वर्षी आपण संकल्प करूया आणि महिलांप्रती आदर प्रदर्शित करत शिव्या देणं थांबवुया! महिलांविषयक शब्दच अधिकमराठी मध्ये बहुतांश शिव्या या आईवरूनच आहेत. स्वत:ची आई आणि बहिण पुरूषांसाठी स्वाभिमान असतो. याला डिवचले की पुरूष चिडतो, असा एक सार्वत्रिक समज आहे. त्यामुळे बहुतांश शिव्या या आई आणि बहिणीवरून दिल्या जातात. या उलट पुरूषांवरून शिव्यांचा वापर फारसा होत नाही. का देतात शिव्या...!अनेकदा किरकोळ कारणांवरून वाद होतात. जेव्हा भांडणाचे मुद्दे संपतात त्यावेळी शिव्यांची लाखोली वाहिली जाते. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तिला खुप राग आलाय असे मानले जाते आणि मग समोरचा माणूस शांत होतो. हे सर्रास घडत असल्यामुळे आता लोकांना शिव्या देण्यात पुरूषार्थ वाटू लागला. नक्को इतके वाईट ऐकण्यापेक्षा आपणच शहाणपणा करून शांत राहू अशी माघाराची भूमिका समोरचा घेतो. याचा अर्थ शिवी देणारा माणूस मला कसे सगळे घाबरले असा काढतो.कोण देतात शिव्या...!गुन्हेगार, पोलिस, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, अवजड वाहनचालक, तळीराम, महाविद्यालयीन युवक, व्यावसायिक यांच्यासह अनेकजण परस्परांना सहज हाक मारण्याच्या आवेगात शिव्या देताना सार्वत्रिक आढळून येतात.गुन्हेगारांबरोबर पोलिसांचा सारखा संबंध येत असल्यामुळे पोलिस सर्वाधिक शिव्या देतात, असा सामान्यांचा समज आहे. वास्तविक पाहता आता सुशिक्षित तरूण या खात्यात येत असल्यामुळे शिव्या देणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. नवीन वर्षात जर कोणाला पोलिस शिव्या देताना आढळले, तर त्यांनी तातडीने याविषयी माहिती मला द्यावी.- राजीव मुठाणे, पोलिस निरिक्षक, साताराआमच्या ग्रुपमध्ये एक मुलगी आहे. सहज काही बोलायचे म्हटले तरीही तिच्या तोंडून ‘नालायक’ हा शब्द निघतो. आम्ही याविषयी वारंवार तिला सांगितले आहे. आता नवीन वर्षाचा संकल्प म्हणून आम्ही तीला हा शब्द उच्चारू न देण्याचा संकल्प केला आहे. यासाठी तीला प्रसंगी दंडही करण्याची आमची तयारी आहे.- प्रियांका शिंदे, विद्यार्थीनीवाद मिटविण्यासाठी अशीलांना आॅफीसमध्ये बोलवावे लागते. काहीदा त्यांच्यात अशी भांडणे जुंपतात की अर्वाच्च शिवीगाळाची जणू स्पर्धाच लागली आहे. अशाावेळी उपस्थित महिला खजिलपणे मान खाली घालून बसतात. म्हणून यापुढे आॅफीसमध्ये कोणीही शिव्या देणार नाही असा संकल्प मी केला आहे.- अ‍ॅड. धीरज घाडगे, सातारा