शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक भाजीला स्वच्छतेचा उतारा

By admin | Updated: October 5, 2015 00:14 IST

हॉटेलमध्ये भाज्या निवडीचा कंटाळा : भाजी स्वच्छतेबाबत गृहिणी अधिक सजग; फ्लॉवर, कोबी, टोमॅटो ताजे असले तरी आतून असू शकतात खराब--लोकमत सर्वेक्षण

सातारा : भाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांचा बेसुमार मारा केला जातो. त्यामुळे निर्भेळ, सकस, पौष्टिक म्हणावा असा आहार आता राहिलेला नाही. प्रत्येक भाजीत विषारी अंश हे असतातच, हे सर्वांना कळून चुकले आहे. भाज्यांची स्वच्छता आवश्यक असते. स्वयंपाक घरात आणि हॉटेल्समध्ये अन्नपदार्थ बनविताना याबाबत नेमकी काय काळजी घेतली जाते याबाबत ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात असे दिसून आले की, हॉटेलमध्ये भाज्या न निवडता फक्त धुवून वापरण्याचे प्रमाण २१ टक्के आहे, तर गृहिणी मात्र भाज्यांच्या स्वच्छतेबाबत अधिक सजग असून त्या भाज्या निवडून स्वच्छ धुवून घेत असल्याचे प्रमाण ६८ टक्के आहे. (लोकमत चमू)रसायने करताहेत रोगप्रतिकारशक्ती क्षीणफळभाज्यांवर पडलेल्या किडीमुळे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर रसायने, कीटकनाशकांची फवारणी करतात. कीटकनाशकांची फवारणी केलेल्या भाज्या, फळे न धुता खाल्यास अनेक रोगांना नियंत्रण दिले जाते. विशेषत: यामुळे मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्तीच क्षीण होत असल्याचे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे.जागतिक आरोग्य संघटनेनेही पिकांवरील कीटकनाशकांच्या दुष्परिणामामुळे काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अनेक नामवंत कंपन्यांनी कोणत्या पिकावर किती प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करावा, हे ठरवून दिलेले असते. मात्र, याची काटेकोर अंमलबजावणी केली जातेच, असे नाही. औषधांची विक्री केल्या जात असलेल्या दुकानदारांकडूनही यासंदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे. कीटनाशकांमध्ये अनेक घातक रसायने असतात. डोळ्यांना सहजासहजी दिसत नसले तरी त्या खाल्याने अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. त्वचा विकास जडणे, कॅन्सर किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याचा धोका असतो. नोकरदार महिलांची कसरतभाजीवर कीटकनाशके मारली असल्याचे कितीही सांगितले जात असले तरी त्या पूर्णपणे निर्जंतुक करणे नोकरदार गृहिणींसाठी जिकिरीचे झाले आहे. आदल्या दिवशीच भाजीची तयारी करून ठेवावी लागत आहे.भाजीमंडईत येणाऱ्या भाज्यांवर कीटकनाशके फवारलेली असतात. याची माहिती असणाऱ्या गृहिणी अत्यंत सावधपणे भाजी धुऊन घेतात.मेथी, चाकवत, पालक यासारख्या पालेभाज्या किमान तीन ते चार वेळा पाण्यातून काढूनच धुतलेल्या भाज्या फोडणीला दिल्या जातात. ४वांगे, दोडका या फळभाज्या कापण्याआधीच धुऊन घेण्याची सवय अनेक गृहिणींनी स्वत:ला लावून घेतली आहे; पण भेंडी आणि गवारी यासारख्या भाज्या तातडीने धुऊन करणे कसरतीचे ठरते. भेंडीत चिकटपणा जास्त असतो.धुऊन घेणे म्हणजे काय?स्वयंपाक करताना अनेक महिला एकात एक कामे उरकून घेत असतात. एकीकडे चपाती, दुसरीकडे भाजी तर तिसरीकडे दूध तापवणे अशा सर्व आखाड्यांवर तिला लढावे लागते. अनेकदा सकाळी मुलांची शाळा, डबे यात त्यांना भाजी धुण्यासाठी वेळ कमी पडतो. अशावेळी केवळ पाण्यातून काढण्यातच त्या समाधान मानतात. वास्तविक पालेभाज्या करताना त्या धुऊन अर्धा तास मिठाच्या पाण्यात ठेवल्याने निर्जंतुक होतात, असे तज्ज्ञ सांगतात. म्हणून रात्रीच जर ही तयारी करून ठेवली तर ताण कमी होईल आणि आरोग्य जपले जाईल. भेंडी लगेच धुऊन केली तर ती अधिक चिकट होते. म्हणून रात्री भेंडी स्वच्छ धुऊन कापडात गुंडाळून ठेवणे सोयीस्कर ठरते. भाजी धुणे म्हणजे पाण्यातून काढणे नव्हे, हे गृहिणींनी मनाशी पक्के करावे.पालेभाजी करताना काही खबरदारी घेणे गरजेचे असते. भाजी निवडल्यानंतर ती चिरण्यापूर्वीच धुवून घ्यावी. चिरलेली भाजी धुतल्यास त्यातील जीवनसत्वे कमी होतात. भाज्या निवडण्याचे प्रमाण कमीचभाज्यांवर कीटकनाशकांची फवारणी केलेली असते. हॉटेलसाठी मंडईतून आलेल्या भाज्या वापरण्यापूर्वी कोणती काळजी घेता, याबाबत विचारले असता काही हॉटेलचालकांनी स्वच्छ धुवून मगच वापरल्या जातात असे उत्तर दिले; पण फ्लॉवर, कोबी, टोमॅटो अशा फळभाज्या वरून धुवून स्वच्छ होत नाहीत. धुण्यापूर्वी भाज्या निवडणे गरजेचे आहे. किडलेल्या भाज्यांचा वापर न केलेलाच बरा. वरुन ताज्या वाटणाऱ्या फळभाज्या अनेकदा आतून किडलेल्या असतात. फ्लॉवरला आतून बारीक पांढऱ्या अळ्या असतात. टोमॅटोंना कीड लागलेली असते. त्यामुळे व्यवस्थित निवडूनच फळभाज्या वापरल्या पाहिजेत.