सातारा : करमणूक म्हणून मित्रांबरोबर पत्ते खेळायला बसता-बसता त्याचा कधी नाद लागला अन् त्या नादात कधी घरदार विकायची वेळ येईल, याचा पत्ता लागत नाही. जुगार, मटक्यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत. ग्रामीण भागातील अड्ड्यांवर छापे टाकून पोलीस कारवाई करत असले तरी सातारा शहरातून तीन पत्तीच्या नावाखाली लपून-छपून खेळ रंगत आहे. ‘सत्ते पे सत्ता’ लावण्याची पैशाची मोजमाप केली जात आहे. सातारा शहर व तालुका पोलिसांनी साताऱ्यातील मटका अड्ड्यांवर छापे टाकून मुद्देमाल हस्तगत केला आहे. ग्रामीण भागात पोलिसांची गाडी आल्याबरोबर पत्ते खेळणाऱ्यांची पळापळ होत आहे. पण साताऱ्यातीळ अवस्था काय आहे, हे पाहण्यासाठी ‘लोकमत टीम’ने स्टिंग आॅपरेशन केले. यामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आले. शहरातील अडगळीची ठिकाणं, पत्राचे शेड, अर्धवट बांधून पडलेल्या इमारती अशा ठिकाणी हा खेळ खेळला जात आहे. पत्ते खेळणाऱ्यांवर पोलिसांचा ‘वॉच’ असल्याने हे ‘खेळाडू’ही भलतेच सावध झाले आहेत. मटक्याची तहान दुर्री-तिर्री’वर भागवत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलेही मागे नाहीत. (लोकमत टीम) ‘एटीएम’ बोले तो पैसा तीनपत्ती हा खेळ सर्वसाधरणत: सात व्यक्तींमध्ये खेळला जातो. याची बोल पाच रुपयांपासून सुरू होते. त्याला कोणतीही मर्यादा राहत नाही. हा खेळ खेळणारे या पैशाला सांकेतिक भाषेत ‘एटीएम’ म्हणतात. असा रंगतो खेळ... पत्यातील ५२ पैकी राजा, राणी आणि गुलाम तीन पाने महत्त्वाची ठरतात. ज्या व्यक्तीकडे ही पाने जास्त संख्येने असतील, तो डावात बाजी मारतो. या खेळाला ‘चाली पेर’ असे म्हटलं जातं. इथे चालते ‘तीनपत्ती’ राजवाड्याजवळ नगर वाचनालय परिसर, मल्हार पेठ परिसर, प्रतापसिंह शेतीशाळा परिसर, सदर बझारमधील वाचनालय परिसर, चारभिंती स्मारक परिसर, अजिंक्यतारा किल्ला, कोटेश्वर मैदान परिसर, शहराजवळील विविध झोपडपट्ट्या, पॉवर हाउस डोंगरावरील पाइपलाइनच्या मागे, मध्यवर्ती बसस्थानक ते क्रीडा संकुल परिसर
पत्त्यातल्या राजा-राणीचे शेकडो ‘गुलाम’
By admin | Updated: December 6, 2015 00:02 IST