शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘शंभर’चा बाजार उठला; ‘दहा-वीस’ची मात्र चलती !

By admin | Updated: November 13, 2016 23:30 IST

आठवडा बाजारात ‘चलती का नाम नोट’ : कोऱ्या करकरीत पाचशे-हजारांच्या नोटा सोडून काहीही बोला; जुन्या-मळक्या नोटाचांही भाव वधारला

सातारा : ‘ओ दादा... ही नोट फाटलीय, दुसरी द्या...’, ‘आमच्याकडनं कोण घेत नाही बघा...’, असले संवादच रविवारच्या आठवडा बाजारात ऐकायला मिळाले नाही. आणखी काही दिवस नवे पैसे मिळाले नाही तर अडचण नको म्हणून सातारकर खिशात असूनही शंभरची नोट मोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे शंभरच्या नोटेचा बाजार उठला आहे. दहा वीसच्या नोटांची चलती दिसत आहे. मळकी, फाटकी नोट असली तरी द्या; पण पाचशे, हजारांची नको. असे शेतकरी म्हणत आहेत. चलनातून पाचशे अन् हजारांच्या नोटा मंगळवारी रात्रीपासून अचानक रद्द करण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच अर्थकारणावर जबर फटका बसला आहे. पहिल्या दोन-तीन दिवसांत तर अनेकांना चहा, नास्टा करण्यासाठीही अवघड झाले होते. या घटनेला पाच-सहा दिवस झाले तरी अजून फारशी परिस्थितीत बदललेली नाही. पण यातून सातारकर मात्र सावरत आहेत. जुना मोटार स्टॅण्ड परिसरात रविवारच्या बाजारात थेट शेतकरीच माल विकण्यासाठी येतात. त्यातच शाळा-महाविद्यालय, नोकरदारांना साप्ताहिक सुटी असल्याने या बाजारात दर रविवारी तुफान गर्दी असते. ऐतिहासिक निर्णयानंतर रविवारी प्रथमच आठवडा बाजार भरला होता. दरवेळीसारखी गर्दीच यंदा दिसत नव्हती. सर्वत्र तुरळक ग्राहक दिसत होते. (प्रतिनिधी) किरकोळ नोटा आल्या बाहेर.. पाचशेच्या नोटा रद्द झाल्यानंतर कसं होईल?, असं वाटलं जात होतं. याचा फटका आठवडा बाजाराला बसलाही. पण जे ग्राहक आले त्यातील बहुतांश जणांकडे दहा, वीस, पन्नासच्या नोटा पाहावयास मिळत होत्या. चाळीसची वस्तू वीसला... शेतकऱ्यांनाही आणलेला माल विकायचा होता. त्यातच ग्राहकांची संख्या रोडावलेली. त्यामुळे बहुतांश वस्तूंच्या किमती कमी होत्या. परंतु हुशार ग्राहक त्यातूनही किमती पाडून मागत होते. अशा वेळी ग्राहक सोडण्यापेक्षा ‘चला घ्या...’ म्हणून माल दिला जात होता. ‘कांदा-बटाटा’वाल्यांकडे पाचशे चालते.. कांदा-बटाटे विक्री करणारे व्यापारीच अधून-मधून एखादा ग्राहक पाचशेची नोट दिली तर ते घेत होते. ग्राहकांनी पाचशेची नोट आहे, असे सांगितले असता पहिला प्रश्न विचारला जायचा. ‘किती घेणार?’ मोठा ग्राहक असला तर हे व्यापारी पाचशेची नोट घेत होते. कोणी काही विचारलंच तर कष्टाचा पैसा हाय? त्याला काय घाबरायचं. बँकेत जमा करू की, असे सांगितले जात होते.